मंगळुरु (कर्नाटक) : मंगळुरूच्या सुरतकल भागात चार अज्ञात हल्लेखोरांनी फाजील नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला ( Another murder took place Mangaluru ) आहे. या हल्ल्यात फाजील याचा मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली ( Murder incident captured in CCTV ) आहे.
मंगळुरूमध्ये आणखी एक हत्या झाली. मंगळुरूच्या सुरथकल भागात गुरुवारी संध्याकाळी चार अज्ञात हल्लेखोरांनी फाजील नावाच्या व्यक्तीची हत्या केली. सुरतकल येथील एका दुकानाबाहेर हल्लेखोरांनी फाजीलवर हल्ला केला होता. फाजीलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा मृत्यू झाला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.