नवी दिल्ली : परदेशातून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये मृत्यू झाला आहे. मरण पावलेला चित्त्याचे नाव उदय असे ठेवण्यात आले होते. त्याला दक्षिण आफ्रिकेतून कुनो येथील राष्ट्रीय उद्यांनात आणण्यात आले होते. तत्पूर्वी, काही दिवसापूर्वी मादी चित्त्याचा मृत्यू झाला होता. रविवारी दुपारी चार वाजता चित्ता उदयचा मृत्यू झाला झाला आहे. त्यांची तब्येत खराब असल्याचे वनविभागाच्या पथकाला सकाळी दिसले होते. यानंतर चित्त्याचाला भूल देण्यात आली होती. त्यांच्यावर सकाळपासून वैद्यकीय केंद्रात उपचार सुरू होते, मात्र, दुपारी ४ वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट : प्रेस नोटनुसार 23 एप्रिल रोजी नर चित्ता उदय सुस्त अवस्थेत अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या जवळ गेल्यावर तो दचकत मान झुकवून चालत होता. आदल्या दिवशीच्या निरीक्षणात तो पूर्णपणे निरोगी होता असे प्रेस नोटमध्ये म्हटले आहे. यानंतर वन्यजीव डॉक्टरांना या बाबत माहिती देण्यात आली होती. माहिती मिळताच डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून चित्त्याचा उदयची तपासणी केली. यादरम्यान तो आजारी असल्याचे दिसून आले. प्रेस नोटमध्ये असेही म्हटले आहे की, सकाळी 11 च्या सुमारास चित्त्याला बेशुद्ध करून उपचार करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. मात्र दुपारी चारच्या सुमारास चित्त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.