अयोध्या -चौदा वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम अयोध्येत परतल्यानंतर अयोध्यावासीयांनी त्यांचे स्वागत करताना विविध प्रकारचे अन्नपदार्थ सादर केले होते. हीच परंपरा अयोध्येत आजही अन्नकूट महोत्सवाच्या नावाने अजूनही कायम आहे. यंदा श्रीरामजन्म भूमी परिसरातील रामल्लाचा तात्पुरता दरबार मोठे आकर्षण ठरला होता. अयोध्येत मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्या मार्गदर्शनात पुजारी प्रदीप दास, संतोष कुमार तिवारी, अशोक दास व प्रेमचंद यांनी 56 प्रकारचे पदार्थ सादर करून श्रीरामांचे स्वागत केले. त्यानंतर भक्तांना प्रसाद देण्यात आला होता. यावेळी गर्भगृहातील रामलल्ला आणि हनुमान यांच्यासह इतर देवांना लाल रंगाची वस्त्रे चढवण्यात आली होती.
अयोध्येत अन्नकूट महोत्सव साजरा, श्रीरामांना 56 प्रकारचा नैवेद्य - अयोध्येत अन्नकूट महोत्सव साजरा
अयोध्येत श्रीरामांच्या भव्य स्वागतासाठी अन्नकूट महोत्सव साजरा केला गेला. मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्या मार्गदर्शनात पुजारी प्रदीप दास, संतोष कुमार तिवारी, अशोक दास व प्रेमचंद यांनी 56 प्रकारचे पदार्थ सादर करुन श्रीरामांचे स्वागत केले.
अयोध्येतील अन्नकूट महोत्सव
हनुमानगढी, मणिराम छावणी, दशरथ महल, राजगोपाल मंदिर, विजय राघव मंदिर, नवीन छावणी, छोटी देवकाली, राजगोपाल मंदिर, राजसदन येथे अन्नकूट उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी जगद्गुरू रामानुजाचार्य स्वामी वासुदेवचार्य यांनी कोशलेश सदनात 1056 प्रकारच्या व्यंजनांचा नैवेद्य दाखवला. तर कनक भवनही मोठे आकर्षण ठरला. दशरथ महलात विंदुगद्याचार्य महंत देवेंद्रप्रसादाचार्य यांच्या देखरेखीत भव्य उत्सव साजरा झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तांची उपस्थिती होती. तर मधुकरी संत मिथिला बिहारी दास यांनी गायन-वादन सादर केले. तर यावेळी आमदार वेद प्रकाश गुप्ता यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते.