पेशावर/अलवर- पाकिस्तानात गेलेल्या दोन मुलांची आई असलेल्या अंजूने मंगळवारी इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर फेसबुक मित्राशी लग्न केले. ही माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. अंजू (३४) ही तिच्या फेसबुक मित्र असलेल्या पाकिस्तानी मित्र नसरुल्लाबरोबर (२९) घरी राहते. जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या स्थानिक न्यायालयात दोघांचा विवाह झाला. अप्पर दीर जिल्ह्यातील मोहर्रर शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी मुहम्मद वहाब यांनी सांगितले की, अंजूने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर दोघांचा विवाह झाला आहे.
सोमवारी दोघेही पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात बाहेर पडले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोघांनी अप्पर दिर जिल्ह्याला चित्राल जिल्ह्याशी जोडणाऱ्या लावरी बोगद्याला भेट दिली. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एका हिरव्यागार बागेत एकमेकांचे हात धरून बसलेले दिसून आले आहेत. उत्तर प्रदेशच्या कैलोर गावात जन्मलेल्या आणि राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात राहणाऱ्या अंजूने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने पाकिस्तानमध्ये सुरक्षित वाटत असल्याचे म्हटले आहे. अंजूला पाकिस्तानात धोका होऊ शकतो, हे लक्षात घेऊन पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे.
अंजू 20 ऑगस्ट रोजी भारतात येणार असल्याचा दावा: अंजूचा प्रियकर नसरुल्लाने अंजू 20 ऑगस्टला भारतात परतणार असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात दोघांच्या प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोघांनी लग्नाआधी प्री-वेडिंग शूट केल्याचा दावा केला जात आहेत. दुसरीकडे भिवडीमध्ये अंजूची मुले आणि पती नाराज आहेत. पाकिस्तान आई गेल्याने मुलांची रडून अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. भिवडीतील सोसायटीच्या गेटवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अंजू 20 जुलैला दुपारी 12 वाजता घरातून बाहेर पडताना दिसून आली आहे. सोसायटीच्या गेटजवळ ऑटोमध्ये सामान ठेवून ती अचानक निघून गेली.