चांगवान: सध्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धा चांगवान ( ISSF Shooting World Cup Changwan ) येथे पार पडत आहेत. या स्पर्धेत मंगळवारी भारताच्या अनिश भानवाला आणि रिधम सांगवान या युवा नेमबाजांनी सांघिक स्पर्धेत कांस्यपदक ( Bhanwala and Sangwan win bronze medal ) जिंकले. दोघांनी आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.
या भारतीय जोडीने कांस्यपदकाच्या प्ले-ऑफ सामन्यात झेकच्या अॅना डेडोवा आणि मार्टिन पोड्रास्की जोडीचा 16-12 असा पराभव ( Anna Dedova and Martin Podraski lost ) केला. आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकातील जोडी म्हणून अनिश आणि रिधमचे हे दुसरे पदक आहे. या जोडीने यावर्षी मार्चमध्ये कैरो विश्वचषक स्पर्धेत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत ( 25m Rapid Fire Pistol Mixed Team Competition ) सुवर्णपदक जिंकले होते.