रोहतक - हरयाणाचे गृह व आरोग्य मंत्री अनिल विज यांना अंबाला छावणी सिव्हिल हॉस्पिटलमधून पीजीआय रोहतक येथे हलवण्यात आले आहे. अनिल विज यांना योग्य उपचारासाठी पीजीआयएमएसमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांना संस्थेच्या विशेष प्रभागात उशिरा दाखल करण्यात आल्याची माहिती पंडित भगवत दयाल शर्मा आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाचे प्रभारी डॉ. गजेंद्र सिंह यांनी दिली.
अनिल विज लवकरच स्वस्थ होतील, याची पीजीआय एमएस व्यवस्थापनाला खात्री आहे. त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली आहे. जी त्यांच्या आरोग्यावर सातत्याने नजर ठेवत आहे, अशी माहिती गजेंद्र सिंह यांनी दिली. तसेच अनिल विज यांना प्लाझ्मा थेरपी देण्याचा विचार करण्यात येत असल्याचेही गजेंद्र सिंह यांनी सांगितले.
अनिल विज यांचे शनिवारी सीटी स्कॅन केले. बऱ्याच समस्या समोर आल्या आहेत. त्यामुळे विभागाने त्यांना पीजीआय रोहतक येथे हलवण्याचा निर्णय घेतला. त्याचा दुसरा कोरोना रिपोर्टही सकारात्मक आला आहे, असेही गजेंद्र सिंह यांनी सांगितले.