पौराणिक माहितीनुसार गणपतीने अंगारक (मंगळ देव) यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिले होते की, जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी तिथी येईल ती 'अंगारकी संकष्टी चतुर्थी' म्हणून (Angarki Sankashti Chaturthi 2023) ओळखली जाईल. हिन्दू पंचागानुसार दर महिन्यात दोनदा चतुर्थी येते – विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चवथ्या दिवशी विनायक चतुर्थी येते. तर कृष्ण पक्षाच्या चवथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते. म्हणून अंगारकी चतुर्थीला श्री गणेश पूजनाचे खूप महत्त्व आहे. यंदा नवीन वर्षातील 10 जानेवारी 2023 ला (10 January 2023) येणारी हि प्रथम अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे.
तारिख आणि चंद्रोदयाची वेळ : (Chaturthi Dates And Moonrise time) यंदा 2023 मध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी 10 जानेवारी रोजी (10 January 2023) आहे. चंद्रोदयाची वेळ 9 वाजून 11 मिनिटे आहे. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला जल अर्पण करावे. यानंतर घरातील मंदिरातील गणेश मूर्तीला गंगाजल आणि मधाने स्वच्छ करावी. सिंदूर, दुर्वा, फुले, तांदूळ, फळे, जनेयू, प्रसाद इत्यादी वस्तू पूजेसाठी गोळा कराव्या. धूप- दीप लावावे. 'ॐ गं गणपते नमः ' या मंत्राचा जप करून पूजा करावी. मंत्राचा 108 वेळा जप करावा. श्रीगणेशासमोर व्रत करून दिवसभर अन्न न खाण्याचे संकल्प घ्यावे. उपवासात फळे, पाणी, दूध, फळांचा रस इत्यादींचे सेवन करता येते.