तुमाकुरू (कर्नाटक) :तुमकुरू जिल्ह्यातील चिक्कनायकनहल्ली येथे अंगणवाडी (Nursery) शिक्षिका आणि मदतनीस यांनी एका मुलाचे गुप्तांगच जाळले. हा मुलगा चड्डीत वारंवार लघवी करत होता. त्यामुळे या अंगणवाडी चालिकेने अशी भयानक शिक्षा त्याला दिल्याचे समोर आले आहे.
तीन वर्षांचा मुलगा सारखा-सारखा चड्डीत लघवी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडी शिक्षिका आणि सहाय्यक (helper) यांनी आगपेटीतील काडीने मुलाच्या गुप्तांगालाच चटका दिला. त्यामुळे मांडीसह गुप्तांगाला जखम झाली. हे प्रकरण उघडकीस येताच जिल्हा बाल हक्क संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात धाव घेतली. तसेच कारवाई करण्यास सुरुवात केली.