सॅन फ्रान्सिस्को: स्पेसएक्स आणि टी-मोबाइलने स्मार्टफोनला थेट उपग्रह कनेक्टिव्हिटी देण्याच्या योजनांचे अनावरण केल्यानंतर, आगामी Android 14 ही यादृष्टीने सक्षम करण्यात येणार आहे. गुगलने याची घोषणाच केली आहे. अँड्रॉइड टीम आता उपग्रहांसाठी त्यांचे व्हर्जन डिझाइन करत आहे. Android च्या पुढील आवृत्तीमध्ये ते असेल. नवीन व्हर्जन Android 14 असेल. अँड्रॉइड 14 स्मार्टफोन उपग्रहाला जोडता येईल. टी मोबाईलला सध्या सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आहे.
ANDROID 14 smartphones अँड्रॉईड स्मार्टफोन आता थेट सॅटेलाईटशी होणार कनेक्ट - सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी
गुगलचे वरिष्ठ उपाध्यक्ष हिरोशी लॉकमेअर Hiroshi Lockheimer यांनी सांगितले आहे की, ते आता उपग्रहांसाठी स्मार्टफोन डिझाइन करत आहेत. अँड्रॉईड फोन थेट उपग्रहांशी कनेक्ट होईल. अँड्रॉईडच्या पुढील आवृत्तीमध्ये हे फीचर आणण्यासाठी उत्सुक असल्याचेही ते म्हणालेत. android 14 smartphones connects to satellite . android 14 smartphones .
गुगलचे हिरोशी लॉकहेमर यांनी दिलेल्या माहितीनुसार आता उपग्रहांसाठी नवीन अँड्रॉईड व्हर्जन डिझाइन केले जात आहे. Android च्या पुढील आवृत्तीमध्ये सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी असेल. त्यांनी पुढे स्पष्ट केले की पुढील वर्षी म्हणजे 2023 च्या मध्यापर्यंत किंवा अखेरीस हे नवीन व्हर्जन तयार होईल. LTE आणि 5G कनेक्शनच्या तुलनेत, उपग्रहांशी कनेक्ट होऊ शकणार्या फोनसाठी वापरकर्त्यांचा अनुभव वेगळा असेल. फोनवरील उपग्रह कनेक्टिव्हिटी मुख्यत्वे आपत्कालीन परिस्थितीत आणि सेल्युलर डेड झोनपासून मुक्ती मिळवण्यास उपयुक्त ठरेल.