महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेश : अल्पवयीन मुलीवर दहा नरधमांकडून बलात्कार, गरोदर राहिल्याने घटना उघडकीस - आंध्र प्रदेश क्राइम न्यूज

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वायएसआर जिल्ह्यातील प्रोद्दातूरमध्ये एका तरुणाने त्याच्या 9 मित्रांसह एका अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून वारंवार बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने ही घटना उघडकीस आली आहे.

raped
raped

By

Published : May 12, 2022, 6:48 PM IST

अमरावती ( आंध्र प्रदेश ) -आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वायएसआर जिल्ह्यातील प्रोद्दातूरमध्ये एका तरुणाने त्याच्या 9 मित्रांसह एका अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून वारंवार बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने ही घटना उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. अल्पवयीन मुलगी भिक्षेकरु असल्याची माहिती मिळाली असून तिचे वडीलही भिक्षेकरू आहेत तर काही वर्षांपूर्वी पीडितेच्या आईचे निधन झाले आहे.

त्याच परिसरात राहणारा चेंबू नवाच्या तरुणाने आपल्या मित्रांसह अनेक महिने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली आहे.

याबाबत 4 मे रोजी महिला कॉन्स्टेबल मल्लेश्वरी यांनी पीडितेला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तीने या घक्कादायक घटनेबाबत वाच्यता केली. चेंबू आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले. कॉन्स्टेबल मल्लेश्वरी यांनी मुलीने दिलेल्या सर्व माहितीचे छायाचित्रणही केले आहे. त्यानंतर सर्व हकीकत सीआयला सांगितली. सीआयने पीडितेला ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमृतनगर येथील आश्रमात हलवण्याच्या सूचना दिल्या. या सर्व प्रकारानंतरही ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगण्यात येत आहे. या महिन्याच्या ८ तारखेला पीडित मुलीला एका खासगी धर्मादाय संस्थेच्या आश्रमात हलवण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना आमच्या निदर्शनास आली आहे. चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोपींवर कडक कारवाई करू. - प्रसादराव, पोलीस उपाधीक्षक, प्रोद्दातूर, वायएसआर जिल्हा.

हेही वाचा -Correctional Home Purnea : बालसुधारगृहाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करून 11 मुले पळाली

ABOUT THE AUTHOR

...view details