अमरावती (आंध्र प्रदेश) : आंध्र प्रदेश सरकारने शनिवारी रात्री उशिरा चेंगराचेंगरीच्या दोन घटनांच्या कारणांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्याची घोषणा केली. (andhra pradesh government commission of inquiry). राज्याचे मुख्य सचिव के. एस. जवाहर रेड्डी यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, चौकशी आयोगाचे (सीओआय) नेतृत्व आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी शेषसायना रेड्डी करणार आहेत. (commission of inquiry into stampede incidents). सीओआयला एका महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 28 डिसेंबर 2022 रोजी SPS नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुरु शहरात तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन चंद्रबाबू नायडू यांच्या सभेदरम्यान चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय 1 जानेवारी रोजी मोफत भेटवस्तू वितरण कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन तिघांचा मृत्यू झाला होता. (stampede incidents in andhra pradesh).
चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शो मध्ये झाली होती चेंगराचेंगरी : यापूर्वी आंध्र प्रदेश सरकारने सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गांसह रस्त्यांवर सार्वजनिक सभा आणि रॅली काढण्यास बंदी घातली आहे. गेल्या आठवड्यात कंदुकुरू येथे तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडू यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी, ज्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर हे घडले आहे. पोलीस कायदा 1861 च्या तरतुदीनुसार सोमवारी रात्री उशिरा हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला. सरकारने आपल्या आदेशात नमूद केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर सभा घेण्याचा अधिकार पोलिस कायदा, 1861 च्या कलम 30 नुसार नियमनाच्या अधीन आहे.