महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Andhra Pradesh Gas Leak : आंध्र प्रदेशातील अनकापल्ली येथील कंपनीत गॅस गळती, 50 जणांची प्रकृती गंभीर - Ankapalli District

Andhra Pradesh Gas Leak : आंध्र प्रदेशमधील अनकापल्ली जिल्ह्यातील अच्युतापुरम येथील एका कंपनीत गॅस गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर प्रकृती खालावल्यामुळे 50 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Andhra Pradesh Gas Lea
Andhra Pradesh Gas Lea

By

Published : Aug 3, 2022, 9:55 AM IST

Updated : Aug 3, 2022, 10:17 AM IST

अमरावती -आंध्र प्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यातील अच्युतापुरम औद्योगिक परिसरात असलेल्या एका कंपनीत विषारी वायूची गळती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर कंपनीत काम करणाऱ्या 50 महिला कर्मचारी आजारी पडल्या, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसईझेडमधील सीड्स क्लोदिंग कंपनीजवळ विषारी वायूची गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर अनेक कर्मचारी बेशुद्ध पडले आणि त्यांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अनकापल्ली जिल्ह्याच्या एसपींनी दिलेल्या माहितीनुसार की, गॅस गळती कथितपणे ब्रँडिक्सच्या आवारात झाली आहे. 50 लोकांना रुग्णालयात हलवण्यात आले असून, जखमींना परिसरातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा -MLA Praniti Shinde : राज्यातील जनतेचं 'नॉट ओके'; शहाजीबापू पाटील यांच्यावर नाव न घेता, प्रणिती शिंदेंची टीका

Last Updated : Aug 3, 2022, 10:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details