हैदराबाद -तिरुपती हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. विविध धनाढ्य व्यक्तींनी तिरुपतीचा बालाजी किंवा इतर देवस्थानी कोटींचे सोनेअर्पण करतात. नुकतेच एका व्यक्तीने तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला (Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala ) सोन्याचे हात ( Varada-Kati Hastas Donates ) अर्पण केले आहेत. या हातावर डायमंड आणि रुबी असून यांची किंमत ही तब्बल 3 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या हातांचे वजन सुमारे 5.3 किलो आहे.
देवाला सोने अर्पण करणे याला अध्यात्मिक महत्त्व असण्यावर विश्वासाचा भाग आहे. अनेक धनिक लोक देवाला पैसे देण्याच्या ऐवजी हिरे, मोती आणि सोने यांचाच चढाव चढवतात. तिरुपती वेंकटेश्वर मंदिर तिरुपती मध्ये स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात आहे.