हैदराबाद -आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील श्रीनिवास या शिल्पकाराने एक लाकडी ट्रेडमिल तयार केली ( Wooden Treadmill ) आहे. त्यांनी आपल्या हाताने ते बनवले असून ते खूप स्वस्त देखील आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra ) यांनी त्यांच्या या कलेचे कौतूक करत मलाही एक हवे आहे, असे ट्वीट केले आहे.
Wooden Treadmill : आंध्र प्रदेशच्या एका कलाकाराने तयार केली लाकडी ट्रेडमिल, आनंद महिंद्रा ट्वीट करत म्हणाले मलाही एक हवे
आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील श्रीनिवास या शिल्पकाराने एक लाकडी ट्रेडमिल तयार केली ( Wooden Treadmill ) आहे. त्यांनी आपल्या हाताने ते बनवले असून ते खूप स्वस्त देखील आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra ) यांनी त्यांच्या या कलेचे कौतूक करत मलाही एक हवे आहे, असे ट्वीट केले आहे.
पूर्व गोदावरी जिल्ह्यातील मनाडपेटा या गावातील श्रीनिवास यांनी गावातीलच एका व्यक्तीला ट्रेडमिल वापरताना पाहिले. त्यानंतर त्यांनी ट्रेडमिलबाबत संपूर्ण माहिती घेतली. नेमके कशापद्धतीने ट्रेडमिल कार्य करते व तांत्रिक बाबी जाणून घेतल्या. त्याचबरोबर ट्रेडमिल बाजारात किती रुपयांत मिळते व तयार करण्यासाठी किती खर्च येतो, याबाबत त्यांनी माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी आपल्या घरीच ट्रेडमिल बनवले. त्यासाठी त्यांना केवळ दहा हजार रुपये इतका खर्च आला. त्यांनी तयार केलेली ट्रेडमिल यशस्वीपणे काम करत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एक उत्तम पर्याय हे लाकडी ट्रेडमिल असू शकते. याबाबत माहिती मिळताच आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत श्रीनिवासचे कौतूक केले व लाकडी ट्रे़डमिल हवी आहे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच तेलंगाणाचे आयटी मंत्री केटीआर ( Minister KTR ) यांनी श्रीनिवासच्या या कार्याचे ट्वीट करत कौतूक केले आहे.