महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेश : ३०० लिटर बनावट सॅनिटायझर जप्त; आरोपीला अटक - Vijayawada sanitiser news

विजयवाडा येथे बनावट सॅनिटायझरचे उत्पादन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विजयवाडा शहरातील गोडाऊनवर छापा टाकला. पोलिसांनी छाप्यादरम्यान बनावट 400 लिटर सॅनिटायझर जप्त केले आहे.

बनावट सॅनिटायझर
बनावट सॅनिटायझर

By

Published : May 4, 2021, 9:24 PM IST

अमरावती -कोरोनात लोकांचे प्राण पैशांसाठी संकटात घालण्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोनाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. याचा फायदा घेत बनावट सॅनिटायझरची निर्मिती आंध्र प्रदेशमध्ये सुरू असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी आंध्र पोलिसांनी विजयवाडा येथून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी 400 लिटर बनावट सॅनिटायझर जप्त केले आहे.

विजयवाडा येथे बनावट सॅनिटायझरचे उत्पादन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विजयवाडा शहरातील गोडाऊनवर छापा टाकला. पोलिसांनी छाप्यादरम्यान बनावट 400 लिटर सॅनिटायझर जप्त केले आहे. हे सॅनिटायझर शहरातील विविध भागांमध्ये नेण्यात येणार होते. पोलिसांनी सॅनिटायझरचा साठा करण्यासाठी आणलेलेले अनेक प्लास्टिक कंटेनरही जप्त केले आहेत.

हेही वाचा-कुणाल कामराने व्हिडिओ पोस्ट करुन उडवली 'कंगना'ची खिल्ली

आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता-

दीपराम असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. या आरोपीची पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी कट रचणे, फसवणूक, चुकीच्या कृत्यातून संसर्ग पसरविणे अशा आरोपांखाली आरोपीवर गुन्हे दाखल केले आहे. तपासानंतर आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा-सेंट्रल व्हिस्टाचे काम थांबवा; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

ABOUT THE AUTHOR

...view details