महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Anantnag Encounter : अनंतनागमध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरलं - दहशतवादविरोधी कारवाई सुरूच

Anantnag Encounter : बुधवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत एक कर्नल, एक मेजर, एक पोलीस अधिकारी, एक जवान आणि एक एसपीओ शहीद झाले होते. त्यानंतर देखील अनंतनागच्या कोकरनाग भागात सुरक्षा दलांची दहशतवादविरोधी कारवाई सुरूच आहे.

Anantnag Encounter
Anantnag Encounter

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 6:32 PM IST

अनंतनागमध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक

अनंतनाग Anantnag Encounter:दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शुक्रवारीही सुरक्षा दल, दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून ही चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलाचे तीन अधिकारी, एक जवान हुतात्मा झालाय. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील उंच भागात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना घेरल्याचा दावा पोलिसांनी केलाय. गडोल भागात दहशतवादी, सुरक्षा दलांमध्ये शुक्रवारी सूर्योदयापूर्वी गोळीबार झाल्याची घटना घडली होती.

पॅरा कमांडोही तैनात :दहशतवाद्यांना कोकरनागच्या जंगलात सुरक्षा दलांनी घेरलं आहे. 2-3 दहशतवादी जंगलात लपून बसले आहेत. दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी सुरक्षा दल रॉकेट लाँचरने बॉम्ब फेकत आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पॅरा कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. गुरुवारी पहाटे चकमक परिसरातून तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. डीजीपी दिलबाग सिंह म्हणाले की, आम्ही दहशतवाद्यांना घेरले आहे. त्यांना सोडले जाणार नाही. ऑपरेशन लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे जवान सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

परिसराला सुरक्षा दलांनी घेरलं : मिळालेल्या माहितीनुसार, रात्रभर दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू होता. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शुक्रवारी सकाळी अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडोळे जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी अतिरिक्त फौजा या भागात पाठवण्यात आल्या. हेलिकॉप्टरद्वारे गडोळे जंगलांवर कडक नजर ठेवली जात आहे. लष्कर, पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अधिकाऱ्यानी सांगितले की, लष्कर तसंच पोलीस संयुक्तपणे परिसरात शोध मोहीम राबवत आहेत.

तिसऱ्या दिवशीही चकमक :अनंतनागमध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरूच आहे. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरलंय. बुधवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत लष्करातील एक कर्नल, एक मेजर, एक पोलीस अधिकारी, एक सैनिक आणि एक एसपीओ हुतात्मा झाल्यानंतर अनंतनागच्या कोकरनाग भागात सुरक्षा दलांची दहशतवादविरोधी कारवाई सुरूच ठेवली आहे.

हेही वाचा -

  1. Anantnag Encounter : जिथं बजावलं पहिलं कर्तव्य तिथंच घेतला अखेरचा श्वास, पानिपतच्या मेजर आशिष धौंचकची शौर्यगाथा
  2. Manipur Violence : मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत 175 लोकांचा मृत्यू, 1 हजार 108 जखमी
  3. Mahadev App scam : ईडीची मोठी कारवाई, सनी लियॉनसह टायगर ईडीच्या पिंजऱ्यात? मुंबईबरोबर अनेक ठिकाणी छापे

ABOUT THE AUTHOR

...view details