महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Anantnag Encounter : हुतात्मा मेजर आशिष धौंचक पुढील महिन्यात येणार होते रजेवर, पण... - अनंतनाग

Anantnag Encounter : पानिपतचे रहिवासी असलेले मेजर आशिष धौंचक हे जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झाले. मेजर आशिष हे पुढच्या महिन्यात त्यांच्या नवीन घराच्या गृहप्रवेश तसंच वाढदिवसाला उपस्थित राहणार होते. त्यांच्या कुटुंबानं अनेक स्वप्नं जपली होती. मात्र आशिष यांच्या हौतात्म्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आशिष यांचे वडील लालचंद सतत रडत असल्याने यांची प्रकृती खालावली आहे.

हुतात्मा मेजर आशिष धौनचक पुढील महिन्यात येणार होते रजेवर
Anantnag Encounter

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 5:44 PM IST

हुतात्मा मेजर आशिष धौंचक पुढील महिन्यात येणार होते रजेवर

पानीपत Anantnag Encounter : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले पानिपतचे मेजर आशिष धौंचक यांचे पार्थिव दुपारी पानिपतला पोहोचण्याची शक्यता आहे. आशिष यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी बिंझौल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सध्या आशिषचे कुटुंब पानिपतमध्ये भाड्याच्या घरात राहतात. पुढच्या महिन्यात आशिष यांच्या नवीन घराचा गृहप्रवेश सोहळा होता. (ashish dhonchak martyred in anantnag encounter)

महिनाभरापूर्वीच सर्व सुख हिरावून घेतले : हुतात्मा आशिष 13 ऑक्टोबरला रजेवर आपल्या नवीन घरात दाखल होणार होते. याच घरात 22 ऑक्टोबरला त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅन होता. पण, या घटनेनं त्यांच्या परिवाराकडून सर्व आनंद हिरावून घेतलाय. आशिष यांची 'गृह प्रवेश' ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आशिषचे पार्थिव प्रथम सेक्टर-७ मधील टीडीआय सिटी येथील बांधकाम सुरू असलेल्या घरात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थीव मूळ गावी बिंझौल येथे नेण्यात येणार आहे. तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पानिपतच्या लालचंदचे लाल शहीद : अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पानिपतच्या लालचंदचे लाल, मेजर आशिष धौंचक हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या हौतात्म्याची बातमी समजताच सर्वत्र शोकाकुल वातावरण आहे. आशिषच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक येत आहेत. त्याचवेळी मुलाच्या हौतात्म्याची बातमी ऐकून वडील लालचंद यांची प्रकृती बिघडली आहे.

आशिषचे पार्थिव आज पानिपतला पोहोचणार :मिळालेल्या माहितीनुसार, आशिष यांचे पार्थिव प्रथम राजौरीहून विमानाने दिल्लीत आणले जाईल. त्यानंतर दिल्लीहून सैन्याच्या ॲम्ब्युलन्सने पानिपतला आणलं जाईल. तिथे लोक त्यांचे अंतिम दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहणार आहेत.

हेही वाचा :

  1. Anantnag Encounter : अनंतनागमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, शोध मोहीम सुरू
  2. Terrorists Attack in Anantnag : अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचा मजुरांवर गोळीबार, सांगलीतील दोन जण गंभीर जखमी
  3. Anantnag Encounter : दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाला मोहालीचा 'लाल', धाय मोकलून रडत आहे कुटुंब

ABOUT THE AUTHOR

...view details