अनंतनाग : दहशतवाद्यांचा खात्मा करण्याकरिता सध्या सैन्यदलाकडून जोरदार सर्च ऑपरेशन सुरू आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार करण्यात सुरक्षा दलाला यश मिळालयं. मिळालेल्या माहितीनुसार, दहा लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलेल्या लष्कर कमांडर उझैर खानलाही ठार करण्यात आलयं. अद्यापही या भागात सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरुच आहे.
2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती-अनंतनागमधील दहशतवादविरोधी मोहिमेची माहिती देताना काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार म्हणाले की, सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरूच राहणार आहे. या भागात अजूनही अनेक भागात शोध घ्यायचा आहे. येथे जाऊ नका, असं आमचं जनतेला आवाहन आहे. आम्हाला 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती होती. चकमकीनंतर तिसरा मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दहशतवाद्याचा मृतदेह सापडल्यानंतर मोहिम थांबविणार आहोत.
आम्हाला लष्कर कमांडर उझैर खानचा मृतदेह सापडला आहे. आम्हाला दुसरा मृतदेहही सापडण्याची शक्यता आहे-काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोठी मोहिम- 13 सप्टेंबरपासून जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सातत्यानं दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत सैन्यदलाचे दोन वरिष्ठ अधिकारी आणि जम्मू-काश्मीरचे डीएसपी यांना वीरमरण आले. त्यानंतर सुरक्षा दलानं दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोठी मोहिम राबविण्यास सुरुवात केली. याच मोहिमेला आज यश आल्याचं दिसून आलयं.
एलईटी कमांडर उझैर खान कोण होता:सोमवारी सुरक्षा दलाला शिपाई प्रदीप सिंह या जवानाचा मृतदेह आढळून आला. दहशतवादी अनंतनागमधी दुर्गम भागात लपून बसल्यानं सुरक्षा दलानं रणनीतीत मोठा बदल केला आहे. सुरक्षा दलांनी ड्रोन आणि हेलिकॉप्टरसह हायटेक सैन्यदलाची उपकरणे मोहिमेत आणली आहेत. स्थानिक माहितीनुसार, कोकरनागच्या नागम गावातील उझैर हा गेल्या वर्षी जुलैमध्ये दहशतवादात सहभागी झाला होता. त्यावेळी इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा उजैर 22 जुलै रोजी बेपत्ता झाल्यानं कुटुंब चिंतेत पडले होते. उझैर घरी न परतल्यानं आणि त्याचा फोनही बंद झाल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. अखेर उझैर दहशतवादी गटात सामील झाल्यानं त्याच्या कुटुंबांना धक्का बसला. ही माहिती पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना दिली होती.
हेही वाचा-
- Anantnag Encounter : अनंतनागमध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरलं
- Anantnag Encounter : अनंतनागमध्ये सहाव्या दिवशीही चकमक सुरूच, एक जवान अद्यापही बेपत्ता