महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Anant Ambani Visits Jagannath : साखरपुड्यानंतर अनंत अंबानींने घेतले भगवान जगन्नाथाचे दर्शन, म्हणाले.. - अनंत अंबानी जगन्नाथ पुरी मंदिरात

अनंत अंबानी यांच्या दर्शनासाठी पुरी जिल्हा प्रशासन आणि मंदिर प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. कडक बंदोबस्तात अनंत अंबानी जगन्नाथ मंदिरात पोहोचले आणि त्यांनी 12व्या शतकातील या मंदिरात पूजा देखील केली.

Anant Ambani Visit Jagannath Puri Temple
अनंत अंबानींने घेतले भगवान जगन्नाथाचे दर्शन

By

Published : Jan 25, 2023, 9:16 AM IST

Updated : Jan 25, 2023, 9:32 AM IST

पुरी (ओडिशा) : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आणि अब्जाधीश मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी मंगळवारी भगवान जगन्नाथ पुरींचे आशीर्वाद घेण्यासाठी भुनेश्वरला पोहोचले. अनंत दुपारी भुवनेश्वरच्या बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर (BPIA) उतरले. अंबानी कुटुंबीयांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. येथून अनंत थेट जगन्नाथ पुरी मंदिरात गेले. तेथे त्यांनी भगवान जगन्नाथाची पूजा केली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

अंबानी कुटुंबाची भगवान जगन्नाथावर श्रद्धा : भगवान जगन्नाथाचा आशीर्वाद घेतल्यानंतर अनंत अंबानी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'मी भगवान जगन्नाथचे दर्शन घेतले. आज देवाचा आशीर्वाद मिळाल्याने मी धन्य झालो आहे. त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहोत अशी मी देवाला प्रार्थना करतो. अनंत अंबानी यांच्या दर्शनासाठी पुरी जिल्हा प्रशासन आणि मंदिर प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. कडक बंदोबस्तात अनंत अंबानी जगन्नाथ मंदिरात पोहोचले आणि 12व्या शतकातील या मंदिरात देवतांची पूजा केली. भगवान जगन्नाथाचा आशीर्वाद घेतल्यानंतर अनंत अंबानी मुंबईला रवाना झाले. अंबानी कुटुंबाची भगवान जगन्नाथावर अपार श्रद्धा आहे. ते अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगी भगवान जगन्नाथाच्या दर्शनाला येतात.

अनंत अंबानींचा नुकताच साखरपुडा झाला :अनंत अंबानी यांचा 19 जानेवारी 2023 रोजी उद्योगपती वीरेन मर्चंटची मुलगी राधिका मर्चंटशी साखरपुडा झाला होता. अनंत आणि राधिकाच्या एंगेजमेंटमध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लोक तसेच अनेक क्रिकेटर्स पोहोचले होते. मुकेश अंबानी यांच्या 'अँटीला' या गगनचुंबी इमारतीमध्ये अनंत आणि राधिकाची एंगेजमेंट झाली होती. त्याचवेळी अनंत आणि राधिकाच्या एंगेजमेंटचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातील एक व्हिज्युअल खूपच खास होते. या व्हिज्युअलमध्ये अनंत आणि राधिकाची एंगेजमेंट रिंग त्यांच्या पाळीव कुत्र्याने आणली होती. या खास प्रसंगी अंबानी कुटुंबाने अनंत आणि राधिकाला सरप्राईज म्हणून एक डान्स परफॉर्मन्सही केला होता.

कोण आहे राधिका मर्चंट? : राधिका मर्चंट ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. ती मूळची कच्छ, गुजरातची आहे. तिने आठ वर्षे भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. ती श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांची शिष्या आहे. जून 2022 मध्ये जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अंबानी कुटुंबाने एका भव्य अरंगेत्रम समारंभाचे आयोजन केल्यानंतर राधिकाने प्रकाशझोतात आली होती. राधिका आणि अनंत यांच्या एंगेजमेंट पार्टीला अंबानींच्या निवासस्थानी अँटिलियामध्ये सलमान खान, शाहरुख खान, जान्हवी कपूर, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि रणवीर सिंग यांसारख्या बी-टाउन सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

हेही वाचा :Anant Radhika Engagement Video : अनंत अंबानी-राधिकाचा एंगेजमेंट सोहळा; पाहा खास व्हिडिओ

Last Updated : Jan 25, 2023, 9:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details