बस्ती ( लखनौ ) - फेरारी विकत घेणे ( Buying a Ferrari ) हे कोणत्याही सामान्य नागरिकाला परवडणारे नाही. असे असले तरी उत्तर प्रदेशातील शिवपूजन या तरुणाने तयार केलेल्या देशी फेरारी ही चर्चेचा विषय ठरत ( Anand Mahindra tweet on Shivpujan car ) आहे. ही फेरारी पाहून महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी शिवपूजनला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
स्वदेशी तंत्रज्ञानावर बनवलेल्या शिवपूजनच्या कारला महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा ( Anand Mahindra praised Deshi Ferrari ) यांनी पसंती दिली आहे. ट्विटर हँडलवर कारचा व्हिडिओ शेअर करत महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी बस्तीच्या या अभियंत्याला ( Basti engineer Anand Mahindra ) भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे शिवपूजनाचा ( UP Shivpujan car ) परिवारच नाही तर संपूर्ण गाव आनंद व्यक्त करत आहे. लहानपणापासूनच सतत नवीन करण्याची आवड असलेल्या शिवपूजनला आर्थिक परिस्थितीमुळे अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. रंगकाम आणि पेंटिंगचे काम शिकून त्यावर चरितार्थ चालविण्यास सुरुवात केली. हा छंद जोपासत त्यांनी चित्रकलाही सुरू केली.
कार तयार करण्यासाठी दीड लाख रुपये खर्च-भिंतींवर रंगवण्याच्या कामाचे कौतुक होत होते. मात्र त्यातून कमाई होत नसल्याचे पाहून 5 वर्षांपूर्वी त्यांनी वेल्डिंग शिकून गेट, ग्रील्स इत्यादी बनवण्यास सुरुवात केली. येथूनच त्यांच्या मनात जुगाड कार बनवण्याचा विचार आला. त्यांच्या भावांनी साथ देत एक लाख रुपयांची व्यवस्था केली. तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर कार तयार झाली. ही कार पहिल्यांदा रस्त्यावर धावली तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. आत्मविश्वास वाढल्यावर त्यांनी गाडीचे उत्तम मॉडेल बनवायला सुरुवात केली. त्यावर दीड लाख रुपये खर्च केले आहेत.
आनंद महिंद्रा प्रभावित- बाईकवर दूध नेण्यात येणारी अडचण लक्षात घेऊन ही कार तयार करण्यात आली. शिवपूजन यांची बस्ती मालवीय रोडवर एक डेअरी आहे. दररोज ते दुधाचे कँड घेऊन जुगाडू गाडीतून गावातून शहरात जातात. एके दिवशी कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून ट्विटरवर शेअर केला. हा व्हिडिओ अनेकांना आवडला होता. हा व्हिडिओ पाहून आनंद महिंद्रा खूप प्रभावित झाले. त्यांनी व्हिडीओ रिट्विट करताना ही स्वदेशी 'फेरारी' कार बनवणाऱ्या शिवपूजनाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर अनेकांनी व्हिडिओला लाइक आणि शेअर करण्यास सुरुवात केली.