महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ईटीव्ही भारत महाराष्ट्राने पब्लिश केली होती न्यूज, आनंद महिंद्रांनी घेतली दखल, ऑफर केली बोलेरो - सांगली जीप आनंद महिंद्रा

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील दत्तात्रय लोहार यांनी एक भन्नाट चार चाकी बनवली आहे. भंगार आणि दुचाकीच्या भागांपासून बनवलेले हे दिमाखदार वाहन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या या प्रयोगाबाबत 'ईटीव्ही भारत'ने 20 डिसेंबरला वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर त्यांच्या सर्जनशीलतेची दखल आता महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लोहार यांच्या वाहनाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

sangli four wheeler anand Mahindra
भन्नाट चार चाकी

By

Published : Dec 22, 2021, 3:34 PM IST

Updated : Dec 22, 2021, 4:34 PM IST

हैदराबाद -महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील दत्तात्रय लोहार यांनी एक भन्नाट चार चाकी बनवली आहे. भंगार आणि दुचाकीच्या भागांपासून बनवलेले हे दिमाखदार वाहन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या या प्रयोगाबाबत 'ईटीव्ही भारत'ने 20 डिसेंबरला वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर त्यांच्या सर्जनशीलतेची दखल आता महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लोहार यांच्या वाहनाचा व्हिडिओ शेअर केला असून त्यांना बोलेरो वाहन ऑफर केले आहे.

ईटीव्ही भारत महाराष्ट्राने पब्लिश केलेली बातमी

हेही वाचा -Kavathe Mahankal Nagar Panchayat Election : कवठेमहांकाळ नगरपंचायतीत शंभर टक्के राष्ट्रवादीची सत्ता येईल - रोहित पाटील

या वाहनाबद्दल आनंद महिंद्रा यांनी कौतुक केले. हे कुठल्याही नियमांमध्ये बसत नाही. पण मी कल्पकतेची प्रशंसा आणि कमीत अधिक या आपल्या लोकांच्या क्षमतेविषयी प्रशंसा करणे कधी सोडणार नाही, असे आनंद महिंद्र आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

महिंद्रा यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये वाहनाला किक स्टार्ट करून चालवताना दाखवण्यात आले आहे. हे वाहन पॅशन या दुचाकीचे इंजिन आणि इतर भागांपासून बनवण्यात आल्याचे लोहार सांगतात. वाहनाच्या मागच्या भागात देखील लोकांना बसायला जागा आहे.

आनंद महिंद्रा यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये या वाहन मालकाला बोलेरो वाहन देणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, हे वाहन नियमांचे उल्लंघन करत असल्याने स्थानिक अधिकारी लवकर किंवा नंतर वाहनचालकाला ते चालवण्यास थांबवतील. मी त्याला वैयक्तिकरित्या त्याच्या वाहनाच्या बदल्यात बोलेरो ऑफर करेन. आम्हाला प्रेरणा देण्यासाठी त्याची निर्मिती महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये प्रदर्शित केली जाऊ शकते. कारण संसाधनसंपन्न म्हणजे कमी संसाधनांत अधिक करणे होय.

आनंद महिंद्रा हे तत्रज्ञान क्षेत्रात काही वेगळे करणाऱ्या लोकांची नेहमीच दखल घेत असतात. त्यांचे ट्विटरवरून कौतुक करतात. त्यांच्या या कार्याने अनेकांना प्रोत्साहन मिळते.

मुलाच्या इच्छेमुळे मिळाली होती प्रेरणा

आज प्रत्येकाला आपल्याकडे चार चाकी गाडी असावी, असे वाटते. अशीच काहीशी इच्छा कडेगाव तालुक्यातल्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांच्या मुलाची होती. लोहार यांची परिस्थिती मात्र बेताची, एक एकर शेती आणि फॅब्रिकेशनचा व्यवसाय, त्यामुळे त्यांना नवी गाडी किंवा जुनी गाडी घेणे अशक्य आहे. पण, मुलाची इच्छा होती की आपल्याकडे चार चाकी गाडी असावी.

दोन वर्षांपासून सुरू होता प्रयोग

दत्तात्रय लोहार यांचा जो व्यवसाय आहे, त्या फॅब्रिकेशनच्या माध्यमातून चार चाकी गाडी कशी बनवता येईल, याच्यावर विचार सुरू झाला. आणि आपल्याकडे असणाऱ्या एका दुचाकी वाहनाचे चारचाकी वाहनात कसे रुपांतर करता येईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी मग त्यांनी हळूहळू भंगारातील साहित्य गोळा करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे असणाऱ्या दुचाकीचे इंजिन, भंगारातील एका जीप गाडीचे साहित्य, रिक्षाचे चाक, त्याचबरोबर इतर साहित्य गोळा करून सर्व जुगाड करत दत्तात्रय लोहार यांनी दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर एक भन्नाट चारचाकी गाडी तयार केली. छोटीशी आणि टुमदार असणारी ही गाडी आता रस्त्यावर धावू लागली आहे.

नॅनोपेक्षा छोटी

दिसायला अगदी एखाद्या विंटेज ( ओल्ड मॉडेल ) प्रमाणे ही गाडी दिसते. नॅनो गाडीपेक्षाही लोहार यांनी बनवलेली गाडी अगदी छोटी आहे. स्वतःच्या कल्पक डोक्याचा वापर करत दत्तात्रय लोहार यांनी ही चार व्यक्ती बसू शकतील अशी गाडी बनवली आहे. विशेष म्हणजे, या गाडील स्टार्टर नसून ती पायाने किक मारून चालू होते. याचे स्टेरींग हे डाव्या बाजूला आहे. पेट्रोलवर ही गाडी धावत असून 1 लिटर पेट्रोलमध्ये 40 ते 45 किलोमीटर इतके मायलेज असून ती ताशी 40 किलोमीटर वेगाने धावते. ही गाडी बनवण्यासाठी लोहार यांना 50 ते 60 हजार इतका खर्च आला आहे.

जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही

आता ही गाडी दत्तात्रय लोहार घेऊन आपल्या कुटुंबासमवेत फिरत आहेत. आणि रस्त्यावरून जाताना ही गाडी पाहून सगळेजण आश्चर्य तर व्यक्त करतातच शिवाय दत्तात्रेय लोहार यांच्या कल्पक बुद्धीलाही सलाम करतात. लोहार यांचे फारसे शिक्षण झाले नाही किंवा कोणतीही पदवी त्यांनी घेतली नाही. पण आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी निर्माण केलेली ही चारचाकी जुगाड गाडी सर्वांचे लक्ष वेधून घेतेच. शिवाय इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर, काहीही अशक्य नाही, हे दाखवून देते.

हेही वाचा -Khanapur Nagar Panchayat Election : 102 वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क

Last Updated : Dec 22, 2021, 4:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details