नवी दिल्ली - भारताचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्या औदार्यासाठी देखील ओळखले जातात. लोकांना एक रुपयात इडली देणाऱ्या तामिळनाडूच्या कमलाथाल आम्मांना आपलं हक्काचं घर मिळणार आहे. यासाठी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कौतूकास्पद पाऊल उचलेले आहे. आम्मांना घर बांधून देण्याचा निर्णय आनंद महिंद्रा यांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी जमीनही खरेदी केली आहे. यासंदर्भात आनंद महिंद्रा यांनी टि्वट करून माहिती दिली. आम्मांना लवकरच स्वतःचे घर मिळणार असून हे घर रेस्टॉरंटच्या आकारात असणार असल्याचे त्यांनी टि्वट करून सांगितले.
वास्तविक 2019 साली तमिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये राहणाऱ्या कमलाथाल या आम्मांचा व्हिडिओ सोशल माध्यामांवर व्हायरल झाल्या होत्या. या आम्मा फक्त 1 रुपयाला ईडली विकतात. एका छोट्या जागेतून त्या इडलीचे दुकान चालवतात. त्यांचे अमुल्य कार्य पाहून आनेकांनी त्यांचे कौतूक केले होते. त्यांचा व्हिडिओ आनंद महिद्रा यांनींही शेअर केला होता आणि मदत करण्याचे आवाहन केले होते. मदतीचा हात पुढे करत आनंद महिंद्रा यांनी आम्मांना एलपीजी गॅसची जोडणी करून दिली होती. आता पुन्हा आनंद महिंद्रा यांनी टि्वट करून कमलाथाल आम्मांना घर बांधून देणार असल्याची माहिती दिली. आनंद महिंद्रा यांनी आम्मांसाठी एक जमीन खरेदी केली असून त्याची नोंदणीदेखील केली आहे. लवकरात लवकर नोंदणी प्रकिया पार पडाल्यामुळे महिंद्रा यांनी कोईम्बतूर नोंदणी कार्यालयाचे आभार मानले.