महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

DNA वरून 160 वर्षांनंतर उलगडले रहस्य, 1857 मध्ये इंग्रजांनी मारले स्वतःचे 282 सैनिक - बंगाल इन्फंट्री बटालियन

१८५७ चा स्वातंत्र्यलढा चिरडून टाकण्यासाठी इंग्रजांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. अलीकडेच, डीएनए चाचणीत असे आढळून आले आहे की त्या काळात ब्रिटिशांनी त्यांच्याच पायदळाच्या एका रेजिमेंटमधील 282 भारतीय सैनिकांना ठार केले होते. या बातमीशी संबंधित इतर पैलूंबद्दल जाणून घेऊया.

DNA वरून 160 वर्षांनंतर उलगडले रहस्य, 1857 मध्ये इंग्रजांनी स्वतःचे 282 सैनिक मारले
DNA वरून 160 वर्षांनंतर उलगडले रहस्य, 1857 मध्ये इंग्रजांनी स्वतःचे 282 सैनिक मारले

By

Published : Apr 28, 2022, 9:58 PM IST

Updated : Apr 29, 2022, 1:16 PM IST

वाराणसी :पंजाबमधील अमृतसर येथील अजनाला येथे 2014 मध्ये विहिरीतून बाहेर पडलेल्या शहीद जवानांच्या 282 पुरुष सांगाड्यांचे सत्य समोर आले आहे. बीएचयू आणि बिरबल साहनी इन्स्टिट्यूट लखनऊसह अनेक संस्थांच्या डीएनए संशोधनातून असे दिसून आले आहे की ते सर्व बंगाल इन्फंट्रीचे भारतीय सैनिक होते जे 1857 मध्ये शहीद झाले होते. 1857 मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध आघाडी उघडली होती, म्हणून त्यांना मृत्युदंड देण्यात आला. तब्बल 160 वर्षांनंतर हे रहस्य उलगडले आहे. हा अभ्यास 28 एप्रिल 2022 रोजी फ्रंटियर्स इन जेनेटिक्स या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

इतिहासकारांच्या मते, पंजाबमधील (आता पाकिस्तानात) मियां मीर येथे तैनात असलेल्या बंगालच्या मूळ पायदळाच्या 26 व्या रेजिमेंटच्या 500 सैनिकांनी बंड केले. ब्रिटिश उपायुक्त फ्रेडरिक हेन्री कूपर यांनी 218 सैनिकांना गोळ्या घालून ठार केले. उर्वरित 282 सैनिकांना अटक करून अजनाळ्याला नेण्यात आले. 237 सैनिकांना गोळ्या घालून 45 जिवंत विहिरीत माती आणि चुना टाकून विहीर बंद करण्यात आली. त्यावर गुरुद्वारा बांधण्यात आला. 2014 मध्ये ही विहीर सापडल्यानंतर तेथून सापडलेल्या नर सांगाड्याची चौकशी सुरू झाली होती.

या विषयाचे वास्तव जाणून घेण्यासाठी पंजाब विद्यापीठाचे मानववंशशास्त्रज्ञ डॉ. जे.एस. सेहरावत यांनी या सांगाड्यांचा डीएन अभ्यास सुरू केला. बिरबल साहनी इन्स्टिट्यूट लखनौ आणि बनारस हिंदू विद्यापीठातील शास्त्रज्ञांसोबत जवळून काम केले. हे त्याच रेजिमेंटच्या सैनिकांचे सांगाडे असल्याचे डीएनए संशोधनातून समोर आले आहे. Frontiers in Genetics या जर्नलमध्ये 28 एप्रिल 2022 रोजी हा अभ्यास प्रकाशित झाला. सीसीएमबीचे मुख्य शास्त्रज्ञ आणि सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग एड डायग्नोस्टिक्स, हैदराबादचे संचालक डॉ. के. भागराज म्हणाले की, बीएचयूचे प्राणीशास्त्राचे प्राध्यापक, ज्ञानेश्वर चौबे यांनी या संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. डीएनए आणि समस्थानिक विश्लेषणाद्वारे, हे सांगाडे पंजाब किंवा पाकिस्तानमधील लोकांचे नसून यूपी, बिहार आणि पश्चिम बंगालमधील लोकांचे आहेत हे शोधण्यात आम्हाला यश आले आहे.

या संशोधनाचे पहिले लेखक डॉ. जगमेदर सिंग सेहरावत यांनी सांगितले की, या संशोधनातून मिळालेले निष्कर्ष ऐतिहासिक पुराव्यांशी सुसंगत आहेत, ज्यात असे म्हटले आहे की 26 व्या मूळ बंगाल इन्फंट्री बटालियनचे सैनिक पाकिस्तानातील मियां-मीर येथे तैनात होते आणि त्यानंतर बंडखोरी करून त्यांना अजनाळ्याला पाठवण्यात आले.जवळील ब्रिटिश सैन्याने त्यांना पकडले आणि ठार मारले. असे या संशोधनाचे पहिले लेखक डॉ. जगमेदर सिंग सेहरावत यांनीही सांगितले होते. बनारस हिंदू विद्यापीठाच्या विज्ञान संस्थेचे संचालक प्रा. ए.के. त्रिपाठी म्हणाले की, हा अभ्यास ऐतिहासिक पुराणकथांच्या तपासात प्राचीन डीएनए-आधारित तंत्रांची उपयुक्तता दर्शवितो.

हैदराबाद स्थित सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) आणि इतर संस्थांच्या संशोधकांनी केलेल्या अनुवांशिक अभ्यासातूनही अशाच प्रकारचे निष्कर्ष समोर आले आहेत. काही इतिहासकारांच्या मते हे सांगाडे भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीदरम्यान दंगलीत मारल्या गेलेल्या लोकांचे आहेत. इतर प्रचलित समज, विविध ऐतिहासिक स्त्रोतांच्या आधारे, हे भारतीय सैनिकांचे सांगाडे होते. तथापि, वैज्ञानिक पुराव्यांअभावी सैनिकांची ओळख आणि भौगोलिक उत्पत्ती यावर जोरदार वाद सुरु आहे, असे सीसीएमबी च्यावतीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सांगाडे गंगेच्या मैदानी भागातील रहिवाशांचे असल्याचे निष्पन्न झाले असा अभ्यास 'फ्रंटियर्स इन जेनेटिक्स' या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात संशोधकांनी डीएनए विश्लेषणासाठी 50 नमुने आणि समस्थानिक विश्लेषणासाठी 85 नमुने वापरले. “डीएनए विश्लेषणामुळे लोकांचे वंश समजण्यास मदत होते आणि समस्थानिक विश्लेषण अन्नाच्या सवयींवर प्रकाश टाकते. दोन्ही संशोधन पद्धतींनी विहिरीत सापडलेले सांगाडे पंजाब किंवा पाकिस्तानात राहणाऱ्या लोकांचे नसल्याचे समर्थन करतात. उलट, डीएनए अनुक्रम उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधील लोकांशी जुळले, असे सीसीएमबीचे मुख्य शास्त्रज्ञ के थंगराज यांनी म्हणाले आहे. जे सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स, हैदराबाद चे संचालक आणि या टीमचे वरिष्ठ सदस्य आहेत.

प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. ज्ञानेश्वर चौबे, ज्यांनी डीएनए अभ्यासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ते म्हणाले की, या निष्कर्षांमुळे देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यातील गायब झालेल्या नायकांच्या इतिहासात एक अध्याय जोडला जाईल. या टीमचे प्रमुख संशोधक आणि प्राचीन डीएनएचे तज्ज्ञ निरज राय म्हणाले की, टीमने केलेले वैज्ञानिक संशोधन पुराव्यावर आधारित इतिहासाकडे पाहण्यास मदत करते. सीसीएमबीचे संचालक विनय नाडीकूरी म्हणाले की, आम्ही मोठ्या प्रमाणावर, प्राचीन डीएनए अभ्यासाची योजना आखत आहोत, ज्यामुळे अनेक ऐतिहासिक आणि पूर्व-ऐतिहासिक तथ्ये उलगडली जातील.

हेही वाचा : स्वातंत्र्याची 75 वर्षे : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अज्ञातवासातील महत्त्वपूर्ण बंगला 'गिड्डापहार'

Last Updated : Apr 29, 2022, 1:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details