बंगळुरू - शहरातील पॅलेस मैदानावर उद्यापासून तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2023 आयोजित केला जाणार आहे. तृणधान्याला बाजारपेठ मिळून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळ्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.
पैलेस मैदानावर भरणार व्यापार मेळा :कृषी विभाग, केएपीपीईसी आणि आयसीसीओएच्या सहकार्याने 20 ते 22 जानेवारी असे तीन दिवस पैलेस मैदानावरील त्रिपुरवासिनी परिसरात हा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आयोजित केला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद जोशी, कृषी मंत्री बी.सी. पाटील, उच्च शिक्षण मंत्री डॉ. अस्वत्थ नारायण, भगवंत खुबा, शोभा करंदलाजे, कैलास चौधरी, राजीव चंद्रशेखर आदींची उपस्थिती राहणार आहे.
सेंद्रिय आणि तृणधान्य उत्पादनांसाठी चांगली बाजारपेठ :2017, 2018 आणि 2019 मध्ये सेंद्रिय आणि तृणधान्य उत्पादनांसाठी चांगली बाजारपेठ प्रदान करण्यासाठी या मेळ्याव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात शेतकरी, खरेदीदार, विक्रेते, निर्यातदार यांना भरपूर संधी प्रदान करण्यात येते. सेंद्रिय आणि तृणधान्यांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा मोठ्या संख्येने सगळ्यांनाच आकर्षित करण्यात यशस्वी झाला. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आयोजित करण्यात आला आहे.