महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 5, 2023, 10:44 AM IST

ETV Bharat / bharat

An incident like Kanjhawala : कंझावाला अपघाताची युपीत पुनरावृत्ती, ट्रकने ३ किमी फरफटत नेल्याने महिलेचा मृत्यू

बांदा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी भीषण ( An incident like Kanjhawala ) अपघात घडला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने स्कूटीला ( Truck rams into a woman on scotty ) जोरदार धडक दिली. यामध्ये स्कूटीवरील कृषी विद्यापीठात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर ट्रकने सुमारे 3 किलोमीटरपर्यंत स्कूटीला खेचून नेली. यादरम्यान स्कूटी आणि ट्रकला आग लागल्यानंतर महिला कर्मचारी जिवंत जाळली. त्याचवेळी घटनेनंतर ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला.

An incident like Kanjhawala
कंझावाला अपघाताची युपीत पुनरावृत्ती

कंझावाला अपघाताची युपीत पुनरावृत्ती

लखनौ :घटनेची माहिती विद्यापीठातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळ गाठून महामार्ग रोखून धरला. त्यांनी अनेक वाहनांची तोडफोड केली. त्याचवेळी पोलीस आणि अग्निशमन दलाने माहिती मिळताच पोहोचून ट्रक आणि स्कूटीला लागलेली आग विझविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व प्रशासनाचे उच्चपदस्थ अधिकारीही ( university female employee to death ) घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आंदोलक विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना समजावून शांत केले. ही घटना ( truck dragged scotty in banda ) बुधवारी सायंकाळी उशिरा कोतवाली परिसरातील मवई गावातून समोर आली आहे. कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठातील महिला कर्मचारी पुष्पा या विद्यापीठातून मवई गावात असलेल्या पेट्रोल पंपावर आपल्या स्कूटीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात होत्या.

महिला मवई बायपासवर येताच भरधाव वेगात आलेल्या ट्रकने ( An incident like Kanjhawala ) स्कूटीला जोरदार धडक दिली. त्यामुळे स्कूटी आणि स्कूटीवर बसलेली महिला कर्मचारी ट्रकखाली अडकली. मात्र, चालकाने ट्रक न थांबवता स्कूटी आणि महिला कर्मचाऱ्याला सुमारे 3 किलोमीटरपर्यंत ओढून नेले. यादरम्यान स्कूटी आणि ट्रकला आग लागल्याने ट्रकचालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पळून गेला. स्कूटी आणि ट्रकसह महिलेला आग लागली. आगीत जळून महिलेचा मृत्यू झाला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलायाची माहिती मिळताच कृषी विद्यापीठातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी निदर्शने करत महामार्ग जाम करण्याबरोबरच अनेक वाहनांची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मी निवास मिश्रा आणि उपजिल्हाधिकारी सूरज शर्मा पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. या लोकांनी आंदोलकांना समज देऊन शांत केले. ही महिला लखनौची रहिवासी होती. गेल्या वर्षी तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. नवऱ्याऐवजी तिला नोकरी मिळाली. उपजिल्हाधिकारी सुरभी शर्मा यांनी सांगितले की, ट्रकने चिरडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यानंतर काही लोक संतापाच्या भरात आंदोलन करत होते. चौकाचौकात पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, अशी त्यांची मागणी होती. तसेच येथे स्पीड ब्रेकर बनवावेत. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या असून त्या लवकरच पूर्ण केल्या जातील. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

कंझावाला अपघाताची पुनरावृत्ती 1 जानेवारीच्या पहाटे दिल्लीच्या कंझावाला परिसरात एका तरुणीला कारने 13 किमीपर्यंत फरफटत नेले. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला असून तिचा विवस्त्र मृतदेह पोलिसांनी जप्त केला. यासंदर्भात पहाटे पोलिसांना फोन आला होता. कारमध्ये पाच आरोपी होते आणि पोलिसांनी एकाच दिवशी सर्व आरोपींना अटक केली.आरोपींची ओळख : 26 वर्षीय दीपक खन्ना हा व्यवसायाने ग्रामीण सेवेचा चालक आहे. दुसरा आरोपी अमित खन्ना (25 वर्षे) हा उत्तम नगर येथील एसबीआय कार्ड कंपनीत काम करतो. तिसरा आरोपी कृष्णा (27 वर्षे) हा स्पॅनिश कल्चर सेंटरमध्ये काम करतो. चौथा आरोपी मिथुन (26 वर्षे) हा नारायणा येथील हेअर ड्रेसर सलूनमध्ये काम करतो आणि पाचवा आरोपी मनोज मित्तल (27 वर्षे) हा रेशन विक्रेता असून दिल्लीच्या सुलतानपुरी भागातील पी ब्लॉकमध्ये रेशन दुकान चालवतो.

ABOUT THE AUTHOR

...view details