महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Earthquake in Leh : लेहच्या उत्तरेस १८९ किमी अंतरावर ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप

Earthquake in Leh नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अल्ची (लेह) पासून 189 किमी उत्तरेस पहाटे 4.19 वाजता 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. earthquake in ladakh

By

Published : Sep 16, 2022, 7:01 AM IST

An earthquake of magnitude 4.8 occurred 189 km north of Alchi Leh
An earthquake of magnitude 4.8 occurred 189 km north of Alchi Leh

लेह ( लडाख ) : Earthquake in Leh नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अल्ची (लेह) पासून 189 किमी उत्तरेस पहाटे 4.19 च्या सुमारास 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. earthquake in ladakh

याआधी 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12.50 च्या सुमारास मिझोराममधील चंफई येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी होती. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू चंफईच्या पूर्वेला पन्नास किलोमीटरवर होता आणि त्याची खोली जमिनीपासून 13 किलोमीटर खाली होती.

मिझोरामपूर्वी 25-26 ऑगस्टच्या रात्री जम्मू-काश्मीरपासून महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचवेळी अफगाणिस्तानात पृथ्वीचा थरकाप झाल्याने लोक भयभीत झाले होते. त्यानंतर रात्री 2.21 मिनिटांनी कोल्हापुरात भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता 3.9 मोजली गेली. यानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 एवढी होती.

ABOUT THE AUTHOR

...view details