पंजाब :अमृतसरमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. ( An Earthquake Occurred ) त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी मोजली गेली. परंतु कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या अमृतसरमध्ये ( Amritsar Punjab ) आज पहाटे ३.४२ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार ( National Center for Seismology ) , भूकंपाचा केंद्रबिंदू अमृतसरच्या 145 किमी पश्चिम-वायव्येस जमिनीखाली 120 किमी खोलीवर होता. ( An Earthquake Occurred At west Northwest )
भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किमी खोलीवर :12 नोव्हेंबरच्या रात्री दिल्ली आणि उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआरमध्ये रात्री आठच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद, नोएडा, बिजनौर, मुरादाबाद आणि अमरोहा येथे भूकंपाचे धक्के बसले. उत्तराखंडमधील ऋषिकेश, अल्मोडा, चमोली, रामनगर आणि उत्तरकाशी येथे भूकंपाचे धक्के जाणवले.भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, नेपाळमध्ये शनिवारी रात्री ७.५७ वाजता ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किमी खोलीवर होता.