महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महागाईचा भडका! अमूल दूध, बँकिंग सर्व्हिस चार्ज आणि सिलिंडर दरात वाढ - सिलेंडरचे दर किती

वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य जनतेच्या खिशाला बसत आहे. आजपासून अमूल दुधाची किंमत वाढली आहे. तर एलपीजी सिलिंडरही महाग झाले आहे. त्याचबरोबर बँकेचा सर्व्हिस चार्जही आजपासून वाढला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आधीच गगनाला भिडलेले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे.

महागाईचा भडका
महागाईचा भडका

By

Published : Jul 1, 2021, 1:28 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागत आहेत. यातच वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य जनतेच्या खिशाला बसत आहे. आजपासून अमूल दुधाची किंमत वाढली आहे. तर एलपीजी सिलिंडरही महाग झाले आहे. त्याचबरोबर बँकेचा सर्व्हिस चार्जही आजपासून वाढला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आधीच गगनाला भिडलेले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे अर्थव्यवस्था आधीच मंदावली असताना अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

अमूलचे दूध आजपासून महागले -

घरात रोज सकाळी येणारे अमूलचे दूध आजपासून महागले आहे. ही दरवाढ संपूर्ण देशात झाली आहे. अमूलने आपल्या सर्व ब्रॅण्डच्या दुधाच्या किमतीत प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या वाढीव किंमती गुरुवारपासून अंमलात आल्या. त्याअंतर्गत दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना अमूल पूर्ण मलईच्या दुधाच्या लिटर पॅकसाठी 57 रुपये, तर फुल क्रीम दुधाच्या अर्ध्या लिटर पॅकसाठी 29 रुपये द्यावे लागतील.

सिलिंडरच्या किंमतीत 25.50 रुपयांची वाढ -

सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने सिलिंडरच्या किंमतीत 25.50 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत 809 रुपयांत मिळणारे सिलिंडर आता 834.50 रुपयांना मिळेल. तसेच आजपासून 19 किलो व्यावसायिक सिलिंडर्सचे दरही वाढले आहेत. त्याची किंमत 76.50 रुपयांनी वाढली आहे. आता ते 1550 रुपयांत उपलब्ध होतील.

आजापासून नवीन सेवा शुल्क लागू -

बँकेचा सर्व्हिस चार्जही वाढत आहे. आजपासून म्हणजे 1 जुलै 2021 पासून बँकेच्या खातेदारांसाठी नवीन सेवा शुल्क लागू होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएम आणि बँक सेवेच्या नियमात काही बदल केले आहेत. चार वेळा पैसे काढल्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी फी भरावी लागेल. तर सर्व नवीन सेवा शुल्क एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खातेधारकांना 1 जुलै 2021 पासून लागू होतील.

पेट्रोल आणि डिझेलचे दर -

  • दिल्ली - पेट्रोल 98.81 रुपये आणि डिझेल 89.18 रुपये प्रति लिटर
  • मुंबई - पेट्रोल 104.90 रुपये तर डिझेल 96.72 रुपये प्रति लिटर
  • चेन्नई - पेट्रोल. 99.80 आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
  • कोलकाता - पेट्रोल 98.64 रुपये आणि डिझेल 92.03 रुपये प्रति लिटर
  • जयपूर -पेट्रोल 105.54 रुपये आणि डिझेल 98.29 रुपये प्रति लिटर
  • लखनऊ -पेट्रोल 95.97 रुपये आणि डिझेल 89.59 रुपये प्रति लिटर
  • भोपाळ -पेट्रोल 107.07 आणि डिझेल 97.93 रुपये प्रति लिटर
  • पाटणा - पेट्रोल 100.81 रुपये आणि डिझेल 94.52 रुपये प्रति लिटर

ABOUT THE AUTHOR

...view details