अलीगढ- अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापकाने पत्नीला तिहेरी तलाक (AMU Professor Triple Talaq To Wife) दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सहाय्यक प्राध्यापकाविरुद्ध हुंड्यासाठी छळ, कौटुंबिक हिंसाचार यासह तिहेरी तलाक ( AMU professor gave triple Talaq ) प्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
लग्नापूर्वी पत्नीला एमटेक करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पत्नीला शिकवण्याऐवजी हुंड्यासाठी छळ केला. पत्नीने विरोध केल्यावर प्राध्यापकाने पत्नीला तिहेरी तलाक ( aligarh latest triple talaq news ) दिला.
प्राध्यापक पतीकडून हुंड्याची मागणी-क्वार्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इक्रा कॉलनीत राहणारी फरहीन इझार यांनी क्वार्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फरहीन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे लग्न 9 नोव्हेंबर 2021 रोजी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या कॉम्प्युटर इंजिनीअरिंग फॅकल्टीचे असिस्टंट प्रोफेसर असद मोहम्मद यांच्यासोबत झाले होते. लग्नाआधी फरहीनला एमटेक करायसाठी मदत करण्याचे त्यांनी मान्य केले होते. पण लग्नानंतर फरहीन यांना एमटेक करू दिले नाही. यासोबतच हुंड्यात फरहीनकडून १० लाख रुपये, फ्लॅट आणि जमिनीची मागणी करण्यात आली. फहरीनवर अनेक आरोप करून तिचा छळ सुरू करण्यात आला. त्यामुळे 14 फेब्रुवारी रोजी ती माहेरी गेली.