नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक फरार अमृतपाल सिंगचा पंजाब पोलिसांसह विविध सुरक्षा यंत्रणा देशभरात शोध घेत आहेत. त्याचे दिल्लीतील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. हे फुटेज २१ मार्चचे असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ दिल्लीतल्या डाबरी येथील साई चौकातील आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामध्ये दिसणारा व्यक्ती अमृतपाल सिंह आहे. तथापि, व्हिडिओमध्ये दिसणार्या व्यक्तीची अमृतपाल सिंग अशी ओळख सांगण्यात येत असली तरी ईटीव्ही भारतने या व्हिडीओची पुष्टी केलेली नाही.
मास्क घालून निघाला:व्हिडिओमध्ये अमृतपाल सिंग मास्क घालून रस्त्यावरून जाताना दिसत आहे. चालणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर पगडी दिसत नाही. त्याचे लांबसडक उघडे केस दिसतात. त्यामुळे तो दिल्लीमार्गे नेपाळला पोहोचल्याची भीती व्यक्त होत आहे. दिल्ली पोलीसही अमृतपाल बाबत सतर्क झाले आहेत. अमृतपाल भारतविरोधी कारवायांमध्ये सामील: अमृतपाल परदेशात बसून आयएसआय आणि खलिस्तानी दहशतवाद्यांच्या चिथावणीवर भारतविरोधी अजेंडा चालवत होता. तो आधी दुबईत काम करायचा, पण आयएसआयच्या संपर्कात आल्यानंतर त्याने नोकरी सोडून भारतात येऊन खलिस्तानसाठी आपला अजेंडा चालवायला सुरुवात केली.