महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Amritpal Singh: खलिस्तानवादी अमृतपाल सिंगच्या समर्थनार्थ रायपूरमध्ये रॅली, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला - पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्या समर्थनार्थ बुधवारी छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये रॅली काढण्यात आली. त्यानंतर रायपूर पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना नोटीस बजावली. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पंजाब सरकारवर हल्लाबोल केला आहे.

AMRITPAL RAIPUR
खलिस्तानवादी अमृतपाल सिंगच्या समर्थनार्थ रायपूरमध्ये रॅली, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

By

Published : Mar 23, 2023, 12:34 PM IST

अमृतपाल सिंगचे समर्थक

रायपूर (छत्तीसगड): खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याच्या समर्थनार्थ रायपूरमध्ये रॅली काढण्यात आली. तेलीबंधा येथून निघालेली रॅली पंचशील नगर येथील आम आदमी पार्टीच्या कार्यालयासमोर संपली. रॅलीदरम्यान आंदोलकांनी अमृतपाल याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा पुतळाही जाळला.

रायपूर पोलिसांची आयोजकांना नोटीस: रायपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रशांत अग्रवाल म्हणाले, अमृतपाल समर्थकांनी रायपूरमध्ये पायी मोर्चा काढला. पोलिसांना रॅलीबाबत अगोदर माहिती देण्यात आली नव्हती. परवानगीशिवाय रॅली काढल्याबद्दल आयोजकांना नोटीस देण्यात आली आहे. अधिवेशनादरम्यान अमृतपालच्या समर्थनार्थ रॅली दुर्दैवी : छत्तीसगडचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ब्रिजमोहन अग्रवाल यांनी रायपूरमध्ये अमृतपालच्या समर्थनार्थ काढलेली रॅली दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. राजधानीत विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना ही रॅली काढण्यात आल्याचे ते म्हणाले.

अमृतपाल निर्दोष, त्याला अडकवण्याचा प्रयत्न : रॅली काढताना आंदोलकांनी अमृतपाल सिंग जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. आप पक्ष आणि भगवंत मान यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. बाबा बुधा साहेब समितीचे सदस्य दिलर सिंह म्हणाले, अमृतपाल निर्दोष आहे. अमृतपालचा कोणताही दोष नाही. अमृतपाल शीखांना एकत्र आणण्याचे काम करत आहे. तरुणांना ड्रग्जपासून दूर ठेवण्यासाठी तो लढत आहे. त्यामुळेच सरकार आणि सुरक्षा यंत्रणा अमृतपाल याच्या विरोधात उतरले आहेत. भविष्यातील रणनीती सांगताना दिलर सिंग म्हणाले की, जोपर्यंत शीखांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत ताटीबंध गुरुद्वारावर बेमुदत संप सुरूच राहणार आहे.

भूपेश बघेल यांचा पंजाब सरकारवर आरोप : रायपूरमध्ये अमृतपाल सिंह यांच्या समर्थनार्थ रॅली काढताना भूपेश बघेल म्हणाले की, स्थानिक प्रशासन त्यावर लक्ष ठेवून आहे. बघेल म्हणाले, पंजाबमध्ये वर्षानुवर्षे शांतता आहे, परंतु जेव्हापासून नवीन सरकार स्थापन झाले आहे, परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. ज्याप्रकारे घटना घडत आहेत ते अत्यंत दुर्दैवी आहे, कारण पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे आणि अशा घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

हेही वाचा: मोदींवर केली टीका, आता राहुल गांधींना कोर्टाकडून शिक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details