अमृतसर (पंजाब) :अमृतपाल सिंग श्री अकाल तख्त साहिबचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांची भेट घेतल्यानंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण करू शकतो. भटिंडा पोलिसांनी तळवंडी साबोकडून येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. श्री दरबार साहिबकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. डीसीपी मोठ्या स्तरावरील अधिकारी स्वत: मोटरसायकलवर स्वार होऊन प्रत्येक मार्गाची तपासणी करत आहेत. अमृतपालचे श्री दरबार साहिब येथे आगमन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आजूबाजूच्या अनेक हॉटेलांचीही झडती घेत आहेत. सर्व मार्गांची कसून तपासणी केली जात आहे. डीसीपी परमिंदर भंडल हे स्वत: मोटरसायकलवर बसून सर्व मार्गांची तपासणी करत आहेत.
भटिंडा आणि लुधियानामध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात : भटिंडा पोलिसांनी तलवंडी साबो बाजूने येणारे सर्व रस्ते बंद केले आहेत आणि प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. लुधियानामध्ये अमृतपाल किंवा त्याच्या साथीदारांना अटक झाल्याची अफवा पसरली आहे. धांडारी भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने अमृतपाल याच्या सहकाऱ्याला अटक झाल्याबद्दल अधिकृत दुजोरा दिलेला नाही.