नवी दिल्ली : फरारी अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी रविवारी अटक असली तरी, त्याला अटक करण्यासाठी पोलिसांना एका महिन्याहून अधिक काळ (36 दिवस) लागला. अजनाळा प्रकरण सुरू झाल्यानंतर 18 मार्चपासून तो फरार होता. पोलिसांकडून कडक देखरेख आणि इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवल्यानंतरही अमृतपाल पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अमृतपालला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्या साथीदारांवर आणि अनुयायांवरही करडी नजर ठेवली होती. मात्र अमृतपाल स्वत:ला पोलिसांपासून लपवण्यासाठी त्याच्या कोणत्याही साथीदाराची किंवा पुरुष साथीदाराची मदत घेत नव्हता.
१० पेक्षा जास्त मैत्रांनींनी केली मदत:तो आपल्या महिला मित्रांच्या मदतीने पोलिसांना सतत चकवा देत होता. पळून जाण्यासाठी आणि लपण्यासाठी अमृतपाल या महिला मित्रांची मदत घेत होता. होशियारपूरमध्ये पोलिसांनी पकडल्यानंतर तो प्रथम पटियाला येथे पळून गेला. त्यानंतर अमृतपाल त्याचा सहकारी पापलप्रीतसोबत त्याची महिला मैत्रिण बलजीत कौरच्या घरी थांबला. बलजीतचे घर हरियाणात असल्याचे सांगण्यात येत आहे. बलजीत आणि त्याच्या भावाच्या फोनचा वापर करून अमृतपालने पुढे पळून लपण्याची योजना आखली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तपास यंत्रणांनी अमृतपालच्या 10 पेक्षा जास्त महिला मैत्रिणींवर 24 तास पाळत ठेवली होती.