अगरतला ( त्रिपुरा ) : पुढील वर्षी होणाऱ्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 जानेवारी रोजी राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ( Amit Shah To Flag Off Bjp Rath Yatra In Tripura ) पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, या आठ दिवसांच्या यात्रेला उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील धर्मनगर येथून हिरवा झेंडा दाखवला जाईल. त्याच दिवशी शाह दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील सबरूम येथे सभेला संबोधित करतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव भट्टाचार्य ( BJP state president Rajeev Bhattacharya ) यांनी सांगितले. यात्रेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे १२ जानेवारीला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा ( BJP President JP Nadda ) कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सत्ताधारी पक्षाने या 'रथयात्रे'ला 'जनविश्वास यात्रा' ( Jan Vishwas Yatra ) असे नाव दिले आहे.( Amit Shah will show the green flag to BJP's Rath Yatra )
शाह यांनी पंतप्रधान मोदींचे केले कौतुक :केंद्रीय मंत्री अमित शहा शुक्रवारी कर्नाटकात होते. कर्नाटकातील मंड्यामध्ये ते म्हणाले की, तीन वर्षांत देशभरात गावपातळीवर दोन लाख प्राथमिक दुग्धशाळा ( Two lakh primary dairies at village level ) सुरू केल्या जातील, ज्यामुळे शेतकऱ्यांना श्वेतक्रांतीशी जोडले जाईल आणि भारताला दूध क्षेत्रात मोठा निर्यातदार बनवेल. स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण करून भारतातील शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा केल्याबद्दल शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. शाह म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर लगेचच भारतीय शेतकऱ्यांनी कृषी मंत्रालयापासून सहकार मंत्रालय वेगळे करावे, अशी मागणी केली होती, यावर कोणी काम केले असते तर आज भारतीय शेतकऱ्यांची स्थिती वेगळी असती.