डुंगरपूर (राजस्थान)Amit Shah On INDIA Alliance : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी विरोधी पक्षइंडिया आघाडीवर जोरदार प्रहार केलाय. तसंच विरोधक 'सनातन धर्माचा' अपमान करत असल्याचा आरोप शाह यांनी केलाय. ते राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या 'परिवर्तन संकल्प यात्रे'च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अमित शाह यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरही निशाणा साधलाय.
'सनातन धर्मा'चा अपमान : "गेल्या दोन दिवसांपासून इंडिया आघाडी 'सनातन धर्मा'चा अपमान करत आहे. द्रमुक, काँग्रेसचे नेते केवळ व्होट बँकेच्या राजकारणासाठी 'सनातन धर्म' संपवण्याची भाषा करत आहेत. आमच्या 'सनातना' धर्माचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी विरोधकांनी अनेकदा सनातन धर्माचा अपमान केलाय. 'सनातन धर्म' समता, सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे, असा आरोप तामिळनाडूचे मंत्री स्टॅलिन केलाय. शाह म्हणाले की, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलासह द्रमुकचे नेते 'सनातन धर्म' मुळासकट उपटून टाकायला हवा, असं म्हणत आहेत. "हे लोक व्होट बँकच्या राजकारणासाठी 'सनातन धर्मा'बद्दल बोलत आहेत. त्यांनी 'सनातन धर्म'चा अपमान केला आहे," असा आरोप शाह यांनी केलीय.
अर्थसंकल्पावर पहिला अधिकार गरिबांचा :पुढे बोलताना शाह म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही अर्थसंकल्पावर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा आहे, असं म्हटलं होतं. मात्र, आमचं सरकार पहिला अधिकार गरीब, आदिवासी, दलित, मागासवर्गीयांचा असल्याचं म्हणतय, असं शाह यांनी म्हटलं आहे. शाह आज राजस्थानमध्ये परिवर्तन यात्रेच्या शुभारंभप्रसंगी डुंगरपूर येथे जाहीर सभेला संबोधित करत होते.