अमरावती (आंध्रप्रदेश) - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रीशैल्यममधील भ्रमरांम्बा मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात गुरुवारी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत कुटुंब होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या परिसरात झाडांच्या बिया लावल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंदिरात नुकतेच सापडलेले पत्रेही पाहिले आहेत. आंध्राचे धर्मादाय मंत्री वेल्लामपल्ली श्रीनिवास, मंदिराचे विश्वस्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्या कुटुंबाचे स्वागत केले.
अमित शाह यांनी सहकुटुंब श्रीशैल्यम येथील भ्रमरांबा मल्लिकार्जुन मंदिरात घेतले दर्शन हेही वाचा-मोदी सरकारच्या दबावामुळे काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट बंद, नाना पटोलेंचा आरोप
भ्रमरांबा गेस्ट हाऊसमध्ये दुपारचे जेवण केल्यानंतर शाह व त्यांचे कुटुंब निघून गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंदिराभोवती राज्य पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. अमित शाह हे बेगपपेठ विमानतळावर उतरले होते. त्यानंतर हेलिकॉप्टरने श्रीशैल्यम येथे पोहोचले.
हेही वाचा-राज्यसभेत महिला खासदारांबरोबरील गैरवर्तवणुकीचा आरोप केंद्राने फेटाळला, जारी केला व्हिडिओ
महाराष्ट्रातील नेत्यांनी नुकतेच अमित शाह यांची दिल्लीत घेतली भेट-
महाराष्ट्रात असलेल्या चार प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी दिल्लीत वाढत आहेत. या भेटींमधून महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्ष एकमेकांना संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे. दिल्लीत राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्यामुळे राज्यातील राजकारणाच्या हालचालींना मोठा वेग आला आहे. गेल्या आठवडाभरापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी दिल्लीत होत असल्याने नेमकं राज्याच्या राजकारणात काय सुरू आहे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट झाली. या भेटी आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तत्काळ दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळते. राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना समोर ठेवून या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे