महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Amit Shah WB visit : सौरभ गांगुलीसोबत अमित शहा घेणार डिनर, दादा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपासून भाजपचे केंद्रीय नेतृत्व राज्यापासून दूर होते. आता अमित शहा दोन दिवसांच्या दौऱ्यावर बंगालमध्ये पोहोचले आहेत. पश्चिम बंगालमध्ये पोहोचताच अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात जोरदार टिका ( Amit Shah slammed WB CM ) केली. घुसखोरी आणि सीएएच्या मुद्द्यावरून गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि टीएमसीवर निशाणा ( Home Minister targeted Mamata Banerjee ) साधला.

sourav Ganguly
सौरभ गांगुली

By

Published : May 5, 2022, 10:47 PM IST

कोलकाता -केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पश्‍चिम बंगाल दौऱ्यामुळे पुन्हा एकदा सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार ( Amit Shah to visit West Bengal )असल्याची अटकळ जोर धरू लागली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे शुक्रवारी सौरव गांगुलीची त्यांच्या निवासस्थानी ( HM meet to Sourav Ganguly ) भेट घेणार आहेत. रात्रीच्या जेवणामध्ये दोघांमध्ये चर्चा होऊ शकते असे सांगितले जात आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपासून भाजपचे केंद्रीय नेतृत्व राज्यापासून दूर होते. आता अमित शहा दोन दिवसांच्या दौऱ्यावर बंगालमध्ये पोहोचले आहेत. पश्चिम बंगालमध्ये पोहोचताच अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात जोरदार टिका ( Amit Shah slammed WB CM ) केली. घुसखोरी आणि सीएएच्या मुद्द्यावरून गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि टीएमसीवर निशाणा ( Home Minister targeted Mamata Banerjee ) साधला.

2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी-अमित शाह हे कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भेट घेऊन संघटनेत नवी ऊर्जा देणार आहेत. या काळात पक्षाचा समर्थक वर्ग जनतेत वाढावा यासाठी राज्यातील अनेक बलाढ्य सेलिब्रिटींना पक्षात सामावून घेण्याची तयारी ते करत असल्याचे मानले जात आहे. सौरव गांगुलीसोबत शुक्रवारी झालेल्या भेटीकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून पाहिले जात आहे. अमित शहा यांच्या शेवटच्या बंगाल दौऱ्यातही ही बैठक नियोजित होती, परंतु सौरव गांगुलीच्या प्रकृतीच्या कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली.

सौरव गांगुलीची पत्नी करणार ओडिसी नृत्य-शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा व्हिक्टोरिया मेमोरियल येथे आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुलीदेखील ओडिसी नृत्य सादर करणार आहेत. कार्यक्रमानंतर अमित शाह बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली यांच्या घरी जाऊ शकतात. अमित शाह त्यांच्या घरी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. गृहमंत्र्यांसोबत राज्यसभेचे खासदार स्वपन दास गुप्ता, बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी हेही उपस्थित राहणार आहेत.

सौरवच्या प्रकृतीची भाजप नेत्यांनी केली होती चौकशी-सौरव गांगुली आणि भाजप नेत्यांच्या जवळीकीची अनेकदा चर्चा होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात सौरव गांगुली हे पंतप्रधान मोदींसोबत होते. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांसोबतचे त्यांचे फोटो सार्वजनिक झाले. सौरव यांची तब्येत बिघडल्यावर पीएम मोदी आणि अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी फोन करून त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. तर अमित शाह यांचा मुलगा जय शाह भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा सचिव आहे. त्यामुळे सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, आतापर्यंत सौरवने या मुद्द्यावर कोणतेही मत वक्तव्य केलेले नाही.

हेही वाचा-हरियाणात अटक केलेल्या दहशतवाद्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी; नांदेडमधील घातपाताचा उधळला डाव

हेही वाचा-Raj Thackeray Ayodhya Visit : 'राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही'

हेही वाचा-खाजगी रुग्णवाहीकेने हुज्जत घातल्याने मृतदेह गाडीवर घेऊन जावा लागला

ABOUT THE AUTHOR

...view details