महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांचा आसाम दौरा - आसाम विधानसभा निवडणुका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (गुरुवार) आसाम दौऱ्यावर असून राज्यातील नागोन आणि कारबी आंगलोंग जिल्ह्यात त्यांची जाहीर सभा होणार आहे. आसाममध्ये येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.

अमित शाह
अमित शाह

By

Published : Feb 25, 2021, 10:57 AM IST

गुवाहटी -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (गुरुवार) आसाम दौऱ्यावर असून राज्यातील नागोन आणि कारबी आंगलोंग जिल्ह्यात त्यांची जाहीर सभा होणार आहे. आसाममध्ये येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका होणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. समाजसुधारक आणि संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मगावाला गृहमंत्री भेट देणार असून येथील १८८ कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत.

संत शंकरदेव यांच्या जन्मगावाला देणार भेट -

शंकरदेवहे १५ व्या १६ व्या शतकातील आसामी संत, विद्वान, कवी, नाटककार, सामाजिक धार्मिक सुधारक होते. आसामच्या सांस्कृतीक आणि धार्मिक वर्तुळात त्यांचे नाव मोठे आहे. त्यांचा या भागावर मोठा प्रभाव असून या समाजाची मते मिळवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. या भागात कूच-राजभोनगशी समाजाचे सुमारे साडेअठरा लाख मते असल्याने याकडे भाजपाने जास्त लक्ष दिले आहे. या दौऱ्यात शाहा कारबी या डोंगराळ भागातील जिल्ह्यालाही भेट देणार आहेत. येथे सार्वजनिक सभेला ते संबोधित करतील. तसेच ईशान्येतील फुटीरतावादी गटातील आत्मसमर्पण केलेल्यांशीही शाह संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे.

भाजप नेत्यांचे बंगाल, आसाम दौरे -

या आधी शहा यांनी २३ जानेवारी आणि ११ फेब्रुवारीला आसाम दौरा केला होता. यावेळीही त्यांनी सार्वजनिक सभेला संबोधित केले होते. पश्चिम बंगाल आणि आसाम राज्याच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून भाजपा काम करत आहेत. शाह यांच्याशिवाय भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी पश्चिम बंगाल आणि आसामचा दौरा केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही बंगाल दौरा केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details