महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Amit Shah IPS Passing Out Parade : आयपीएस बॅचच्या पासिंग आऊट परेडला अमित शाहंची उपस्थिती - अमित शहा हैदराबादमध्ये

एसव्हीपीएनपीएचे संचालक एएस राजन यांनी सांगितले की, दीक्षांत परेडमध्ये एकूण 195 प्रशिक्षणार्थी अधिकारी सहभागी होत आहेत, त्यापैकी 29 प्रशिक्षणार्थी अधिकारी इतर देशांतील आहेत. एकूण 166 आयपीएस प्रोबेशनर्सपैकी 114 अभियांत्रिकीच्या पार्श्वभूमीचे आहेत तर 22 कला शाखेचे आणि 17 विज्ञान शाखेचे आहेत.

Amit Shah
अमित शाह

By

Published : Feb 11, 2023, 10:53 AM IST

हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादमध्ये भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) प्रोबेशनरी अधिकाऱ्यांच्या पासिंग आऊट परेडला हजेरी लावली. हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA) येथे ही परेड झाली. एसव्हीपीएनपीएचे संचालक एएस राजन यांनी सांगितले की, दीक्षांत परेडमध्ये एकूण 195 प्रशिक्षणार्थी अधिकारी सहभागी होत आहेत, त्यापैकी 29 प्रशिक्षणार्थी अधिकारी इतर देशांतील आहेत. केरळ कॅडरचे आयपीएस प्रोबेशनर शहंशा केएस यांनी परेडचे नेतृत्व केले. ते फेज-1 बेसिक कोर्सचे टॉपर आहेत. औपचारिक मार्चपास्टनंतर शाह यांनी आयपीएस प्रोबेशनर्सना संबोधित केले.

सायबर सुरक्षेवरील आव्हानांवर लक्ष : एकूण 166 आयपीएस प्रोबेशनर्सपैकी 114 अभियांत्रिकीच्या पार्श्वभूमीचे आहेत तर 22 कला शाखेचे आणि 17 विज्ञान शाखेचे आहेत. सुमारे 95 IPS प्रोबेशनर्सना पूर्वीचा कामाचा अनुभव आहे. राजन म्हणाले की, प्रशिक्षणात सायबर सुरक्षेवरील उदयोन्मुख आव्हानांवर लक्ष केंद्रित केले गेले. यासोबतच वर्तणूक, नैतिकता, जनसंपर्क आणि न्यायालयीन कला आणि मॉक ट्रायल्स यासह कायदेशीर बाबींवरही लक्ष दिले गेले आहे.

द्रौपदी मुर्मू ओडिशा दौऱ्यावर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या ओडिशाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दरम्यान मुर्मू यांनी योगाभ्यास करण्याच्या गरजेवर भर दिला. यामुळे नागरिकांची आध्यात्मिक वाढ होण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे लोकांचा आणि संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास होईल, असे त्या म्हणाल्या. मुर्मू पुढे म्हणाल्या की, भारतातील निम्मी लोकसंख्या महिलांची आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देश 'विश्वगुरू' होऊ शकत नाही. भूतकाळातील तसेच वर्तमानातील महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकून राष्ट्रपती म्हणाल्या, 'अध्यात्म, राजकारण, शिक्षण किंवा इतर कोणतेही क्षेत्र असो, महिलांनी नेहमीच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्या माणसं घडवतात आणि हीच माणसं एक राष्ट्र मजबूत बनवतात.

आज मुर्मू त्यांच्या दिवसाची सुरुवात भगवान लिंगराज मंदिराला भेट देऊन करतील आणि नंतर कटक येथे राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेत दुसऱ्या भारतीय तांदूळ काँग्रेसच्या उद्घाटनासाठी आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहतील. राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. भुवनेश्वर-कटक भागात सुमारे 1500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा :Lalu Prasad Yadav News : 'आता तुम्ही वडिलांची काळजी घ्याल', लालूंची मुलगी रोहिणी आचार्य यांची भावनिक पोस्ट

ABOUT THE AUTHOR

...view details