महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजीनाम्याची चर्चा; कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा घेणार राज्यपालांची भेट - मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा

बीएस येदियुरप्पा आपल्या मुख्यमंत्रिपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. यानंतर ते विधानभवनातील बंकेट हॉलमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील. असा विश्वास आहे की, या दरम्यान, 79वर्षीय येदियुरप्पा आपले निरोपाचे संबोधिन करतील.

BSY
मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा

By

Published : Jul 26, 2021, 12:00 PM IST

बंगळुरु -मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, ते आज (सोमवारी) राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेणार आहेत. सूत्रींनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपाल गेहलोत यांनी येदीयुरप्पा यांना दुपारी दोन वाजेची वेळ दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून राज्यपालांची वेळ मागण्यात आली होती. यानंतर नवी दिल्लीहून पत्र आल्यानंतर आज दोन वाजेची वेळ देण्यात आली आहे.

बीएस येदियुरप्पा आपल्या मुख्यमंत्रिपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. यानंतर ते विधानभवनातील बंकेट हॉलमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील. असा विश्वास आहे की, या दरम्यान, 79वर्षीय येदियुरप्पा आपले निरोपाचे संबोधिन करतील. दरम्यान, यानंतर लिंगायत समाजाचे नेत्यांनी बैठक बोलाविली आहे. बैठकीनंतर ते राज्यपालांना भेटणार आहेत.

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुका पाहता नेतृत्त्व बदलाची शक्यता आहे. तर आगामी काळात बीएस येदीयुरप्पा यांचे पुत्र आणि प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांना मंत्रिमंडळात मोठी जबाबदार मिळणार असल्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details