मदुराई (तामिळनाडू) - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेकांच्या मनात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. यातच तामिळनाडू येथे एक धक्कादायक बाब समोर आली ( due to Covid fear family suicide in Kalmedu ) आहे. येथे कोरोना संसर्ग पसरण्याच्या भीतीने एका कुटुंबातील चार सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा ( family consume poison in Tamil Nadu ) प्रयत्न केला. यात घटनेत २३ वर्षीय महिलेसह तिचा तीन वर्षांचा चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तामिळनाडूतील कलमेडूजवळील एमजीआर कॉलनीत शनिवारी ही घटना घडली.
विष पिऊन कुटुबांचा आत्महत्येचा प्रयत्न -
तामिळनाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, २३ वर्षीय ज्योतिका आपल्या तीन वर्षींय रितीश या चिमुकल्यासह तिच्या पतीपासून वेगळी आई लक्ष्मी आणि भाऊ सिबराजसोबत राहत होती. ज्योतिकाचे वडील नागराज यांचे अलीकडेच डिसेंबरमध्ये निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक दबाव होता. त्यात ८ जानेवारीला ज्योतिका कोरोना बाधित असल्याचे समोर आले. ही माहिती ज्योतिकाने तिच्या आईला दिली. त्यामुळे ती घाबरली. त्यानंतर कोरोनाच्या दहशतीने कुटुंबातील सर्व सदस्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विष पिऊन कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.