नवी दिल्लीअमेरिकन पत्रकार अंगद सिंग बुधवारी रात्री येथे उतरल्यानंतर लगेचच न्यूयॉर्कला परत पाठविण्यात आले American journalist deported from Delhi airport to New York असा दावा त्यांच्या आईने फेसबुक पोस्टमध्ये Facebook post केला आहे. आशियावर लक्ष केंद्रित करून व्हाइस न्यूजसाठी माहितीपट तयार करणारे अमेरिकन पत्रकार अंगद सिंग हे भारताच्या वैयक्तिक भेटीवर होते, असे त्यांची आई गुरमीत कौर यांनी सांगितले. माझा मुलगा, जो एक अमेरिकन नागरिक आहे, तो 18 तासांचा प्रवास करून पंजाबमध्ये आम्हाला भेटण्यासाठी दिल्लीला आला होता, त्याला लगेच हद्दपार deported करण्यात आले. कौर म्हणाल्या की, पुढील फ्लाइटने लगेचच न्यूयॉर्कला परत जा, असे त्याला सांगण्यात आले.
American journalist deported अमेरिकेच्या पत्रकाराला दिल्ली विमानतळावरून न्यूयॉर्कला परत पाठविले - American journalist deported
आशिया विभागावर लक्ष केंद्रित करून व्हाइस न्यूजसाठी माहितीपट तयार करणारे अमेरिकन पत्रकार अंगद सिंग American journalist Angad Singh भारताच्या वैयक्तिक भेटीवर आले होते. मात्र त्यांना कोणतेही कारण न देता दिल्ली विमानतळावरून परत पाठवले असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. केंद्र सरकारला मागे घ्यावे लागलेल्या शेतकरी कायद्याच्या विषयावर अंगद सिंग यांनी माहिती पटांची मालिका तयार केली होती. त्यावरुनच त्यांना माघारी पाठविले गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
त्यांनी याबाबत कोणतेही कारणदिले नाही. पण आम्हाला माहित आहे की त्याच्या पुरस्कार विजेत्या पत्रकारितेची त्यांना भीती वाटते. त्याने केलेल्या कथा सक्षम आहेत. हे त्याचे मातृभूमीवरचे प्रेम आहे की, तो यासंदर्भात शांत राहू शकत नाही. व्हाइस न्यूजचे अत्याधुनिक रिपोर्टिंग त्यांच्यापर्यंत पोहोचते, असा दावा कौर यांनी केला. सिंग यांनी भारतातील कोविड 19 साथीच्या आजारावर तसेच आता रद्द करण्यात आलेल्या तीन शेती कायद्यांच्या विरोधात राष्ट्रीय राजधानीच्या सीमेवरील शेतकऱ्यांच्या निदर्शनांवर माहितीपटांची मालिका तयार केली आहे. सिंग यांनी गेल्या वर्षी महामारीच्या घातक डेल्टा लाटेचे कव्हरेज Delta wave coverage केले होते, त्यासाठी त्यांना एमी नामांकन मिळाले होते. सिंग यांच्या हद्दपारीवर Angad Singh deported तात्काळ कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.