महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मुकेश अंबानी कुठेही स्थलांतर करणार नाही; रिलायन्स इंडस्ट्रीजचे स्पष्टीकरण - मुकेश अंबानी कुठेही स्थलांतर करणार नाही

मुकेश अंबानी लंडनमध्ये स्थलांतर करणार असल्याच्या वृत्ताचे रिलायन्स इंडस्ट्रीजकडून खंडन करण्यात आले आहे. याविषयी माध्यमांमधून प्रसारित झालेले वृत्त हे अनुचित तसेच निराधार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुकेश अंबानी कुठेही स्थलांतर करणार नाही; रिलायन्स इंडस्ट्रीजचे स्पष्टीकरण
मुकेश अंबानी कुठेही स्थलांतर करणार नाही; रिलायन्स इंडस्ट्रीजचे स्पष्टीकरण

By

Published : Nov 6, 2021, 7:09 AM IST

नवी दिल्ली : उद्योजक मुकेश अंबानी यांची लंडन किंवा जगात इतरत्र कुठेही स्थलांतर करण्याची योजना नसल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याविषयी माध्यमांमधून प्रसारित झालेले वृत्त अनुचित आणि निराधार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजने म्हटले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे स्पष्टीकरण

रिलायन्स इंडस्ट्रीजकडून याविषयी एक स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे. "लंडनच्या बकिंगहमशायरमधील स्टोक पार्कला आपले पहिले निवासस्थान बनविण्याचा विचार अंबानी कुटुंबियांकडून केला जात असल्याचे वृत्त अनुचित आणि निराधार आहे. आमचे अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांची लंडन किंवा जगात इतरत्र कुठेही स्थलांतर करण्याची योजना नाही" असे स्पष्टीकरण रिलायन्स इंडस्ट्रीजकडून जारी करण्यात आले आहे.

"RIL समुहाची कंपनी, RIIHL, ज्याने अलीकडेच स्टोक पार्क इस्टेट विकत घेतली आहे, हे स्पष्ट करू इच्छिते की, या वारसा मालमत्तेचे संपादन करण्याचे उद्दिष्ट याला प्रीमियर गोल्फिंग आणि स्पोर्टिंग रिसॉर्ट म्हणून वृद्धिंगत करणे हा आहे, तसेच नियोजन मार्गदर्शक तत्त्वे आणि स्थानिक नियमांचे पूर्णपणे पालन करत आहे. या संपादनामुळे समूहाच्या वेगाने वाढणाऱ्या ग्राहक व्यवसायात भर पडेल. त्याच बरोबर, ते जागतिक स्तरावर भारताच्या प्रसिद्ध हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा ठसा देखील विस्तारेल." असेही या स्पष्टीकऱणात म्हटले आहे.

592 कोटींचे स्टोक पार्क -

स्टोक पार्क ही मालमत्ता अंबानी यांनी 592 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. ऑगस्ट महिन्यापासून याठिकाणी अंबानी कुटुंबीयांच्या गरजेप्रमाणे सुविधा उभारण्याचे काम सुरु झाले होते. अंबानी कुटुंबीय दरवर्षी दिवाळी मुंबईतच साजरी करतात. मात्र, बऱ्याच वर्षांनंतर अंबानी कुटुंबीय दिवाळीच्या काळात परदेशात आहेत. दिवाळीनंतर ते मुंबईत परततील. त्यानंतर ते साधारण एप्रिल महिन्यात लंडनच्या स्टोक पार्कमध्ये राहायला जातील, अशी माहिती असल्याचे वृत्त आधी आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details