महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Amazon Layoffs : अ‍ॅमेझॉनमध्ये नोकरकपात  १० हजार इंजिनिअर धोक्यात - Amazon Layoffs

अ‍ॅमेझॉनने मोठ्या प्रमाणावर आपल्या कर्मचार्‍यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे.( Amazon Begins Mass layoffs In Us )

Amazon News
अ‍ॅमेझॉन

By

Published : Nov 17, 2022, 12:48 PM IST

अमेरिका : ( Amazon Layoffs ) अ‍ॅमेझॉनने मोठ्या प्रमाणावर आपल्या कर्मचार्‍यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. यातील बहुतांश कर्मचारी अलेक्सा आणि रोबोटिक्स विभागात कार्यरत आहेत. अ‍ॅमेझॉनने काढून टाकलेल्या अनेक कर्मचार्‍यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया वेबसाइटवर त्यांच्या तक्रारी सांगून ई-कॉमर्स कंपनीमधील नोकरकपात सुरू असल्याचे सांगितले. ट्विटर आणि मेटानंतर, अ‍ॅमेझॉन मोठ्या प्रमाणात टाळेबंदीच्या यादीत सामील झाले आहे. ( Amazon Begins Mass layoffs In Us )

अलेक्सा, रोबोटिक्स, लॅबचे कर्मचारी :नोकरकपात झालेले बहुतांश कर्मचारी अ‍ॅमेझॉनच्या अलेक्सा (Alexa) विभाग, अ‍ॅमेझॉन रोबोटिक्स (Amazon Robotics), अ‍ॅमेझॉन लॅब 126 (Amazon Lab126) आणि अ‍ॅमेझॉन लुना (Amazon Luna) मध्ये काम करणारे होते. वॉशिंग्टन पोस्टने सर्वप्रथम असे वृत्त दिले होते की अ‍ॅमेझॉनने अमेरिकीतील आपल्या कर्मचार्‍यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे.

10,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता :ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन या आठवड्यात मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरू करणार आहे. यातील बहुतांश कर्मचारी रिटेल, अप्लायन्स आणि क्लाउड गेमिंग विभागातील आहेत. तसेच कंपनी 10,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, अलेक्सा व्यवसाय दरवर्षी 5 अब्ज डॉलर इतका तोट्यात आहे. 31 डिसेंबरपर्यंत, अ‍ॅमेझॉनमध्ये अंदाजे 1.6 दशलक्ष पूर्णवेळ आणि अर्धवेळ कर्मचारी होते. अहवालानुसार, कंपनीने केलेल्या नोकरकपातीचा वाटा अ‍ॅमेझॉनच्या कॉर्पोरेट कर्मचार्‍यांपैकी 3 टक्के आणि जागतिक कर्मचार्‍यांपैकी 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. यापूर्वी अलीकडेच अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने जात असल्याचे संकेत दिले होते.

कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना :अ‍ॅमेझॉनच्या माजी कर्मचार्‍यांपैकी एकाने लिंक्डइनवर लिहिले की, 'मला अत्यंत दुःखाने कळवावे लागत आहे की अ‍ॅमेझॉनवरील मोठ्या प्रमाणात नोकरकपातीचा मलाही फटका बसला आहे. मी कामाच्या शोधात असून, जावा डेव्हलपर म्हणून कोणाकडेही नोकरभरती असल्यास कृपया मला या कठीण काळात मदत करा. तसेच अ‍ॅमेझॉनच्या आणखी एका माजी कर्मचाऱ्याने लिहिले, 'मी 6 वर्षे अ‍ॅमेझॉनसोबत होतो. आम्ही सुरुवातीच्या दिवसांपासून अलेक्साला वाढताना पाहिले आहे आणि हा एक चांगला अनुभव होता. आम्ही अलेक्साच्या विकासाचा भाग होतो याचा आम्हाला आला आनंद आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details