भिक्कनूर: कामरेड्डी जिल्ह्यातील भिक्कनूरच्या काचापूर गावातील कमारी नागास्वामी यांनी अत्यंत कमी खर्चात भात लावणीचे यंत्र बनवले आहे. त्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे. तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांनी अनेक आर्थिक अडचणींना तोंड देत आयटीआय पूर्ण केले.
कमारी नागास्वामी याने काही काळ हैदराबाद येथे खाजगी नोकरी केली. कोरोनाच्या काळात नोकरी गमावल्यानंतर नागास्वामी त्याच्या मूळ गावी आला. त्याच्या एक एकर शेतात शेती करत होता आणि आईसोबत राहत होता.
शेतामध्ये पेरणीसाठी मजूर उपलब्ध मिळायचे नाहीत. शेतकऱ्यांवर जास्तीचा आर्थिक बोजा पडायचा. त्यामुळे कमी खर्चात यासाठी यंत्र बनवण्याचा निर्णय त्याने घेतला. युट्युबवर विविध व्हिडिओ पाहिल्यानंतर लहान भाऊ संदीप कुमारच्या मदतीने वर्षभर मेहनत केली. त्यानंतर सुमारे ५० हजार रुपये खर्चून भात लावणीचे यंत्र बनवले.
यात दोन 12-व्होल्ट बॅटरी आणि एक BRDC मोटर वापरण्यात आली आहे. त्याने भात लावण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या मोटारीने खेचण्यासाठी मशीनची रचना केली. रविवारी त्यांच्या शेतात प्रायोगिकरित्या त्याने भातलावणी केली. ते त्यात यशस्वी झाले. गावकऱ्यांनी या तरुणांचे अभिनंदन केले.