मिदनापूर ( प. बंगाल ) : नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन हे केंद्रातील मोदी सरकार विरोधात वारंवार बोलताना दिसत आहेत. अलीकडेच त्यांनी पुन्हा टीका केली. ममता बॅनर्जी यांच्यात देशाच्या पुढील पंतप्रधान होण्याची क्षमता आहे, असेही ते म्हणाले. त्यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी अमर्त्य सेन यांच्यावर टिका केली की, त्यांनी परदेशात निश्चिंत राहावे. मोदीजींच्या नेतृत्वात देश पुढे जाईल. तुम्हाला काही सल्ला द्यायचा असेल तर द्या. अफगाणिस्तानचे तालिबान सरकार किंवा युक्रेनच्या झेलेन्स्कीला सल्ला द्या ते कामी येईल. त्यांच्या सल्ल्याची इथे गरज नाही.
नोबेल विजेत्यावर केली टीका :अमर्त्य सेन यांनी अलीकडेच देशाच्या सद्य परिस्थितीवर अनेक भाष्य केले आहेत. त्या यादीत देशातील अल्पसंख्याकांच्या स्थितीव्यतिरिक्त इतर अनेक मुद्द्यांचा समावेश होता. ते पूर्व मेदिनीपूरमधील एग्रा येथे पार्टीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. सुवेंदू यांनी नोबेल विजेत्यावर टीका केली. सुवेंदू यांनी दावा केला की 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अमर्त्य सेन यांनी राजकीय भाष्यकार म्हणून नरेंद्र मोदी यापुढे पंतप्रधान होऊ शकत नाहीत असे म्हटले होते. मात्र निवडणुकीनंतर भाजपच्या जागा वाढल्या. यानंतर ते म्हणाले, जेव्हा अमर्त्य सेन यांनी मतदानाच्या दीड वर्ष आधी हे भाकीत केले होते. तेव्हा मी निश्चितपणे म्हणू शकतो की, मोदीजींच्या भाजप पक्षाच्या जागांची संख्या वाढेल. 400 हून अधिक जागांसह मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील.