अनंतनाग : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात एका महिला यात्रेकरूचा अपघाती मृत्यू झाला. तिचे वय 53 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेदरम्यान एका डोंगरावरील दरड कोसळली. यात ही यात्रेकरु महिला सापडल्याने तिचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माउंटन रेस्क्यू टीमने महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे प्रयत्न अपयशी ठरले. दरम्यान या प्रयत्नात जम्मू-काश्मीर पोलिसांच्या माउंटन रेस्क्यू टीमचे अन्य दोन सदस्यही गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितले.
पोलीस कर्मचारी जखमी : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृत महिलेची ओळख पटली असून त्यांचे नाव उर्मिला बेन वय 53 असे आहे. ही दुर्घटना संगम टॉप आणि खालील गुहाच्या दरम्यान झाली. यादरम्यान ही महिला पवित्र गुहाकडे पायी प्रवास करत होती. पोलिसांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या माउंटन रेस्क्यू टीमचे दोन सदस्य, मोहम्मद सालेम आणि मोहम्मद यासीन हे देखील या घटनेत जखमी झाले आहेत. हे दोघेही महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. घटनेनंतर जखमी पोलिसांना लष्कर आणि प्रवाशाच्या मदतीसाठी कर्तव्यावर तैनात असलेल्या खासगी हेलिकॉप्टरमधून रुग्णालयात नेण्यात आले.