महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सलग तिसऱ्या वर्षी अमरनाथा यात्रा रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाचा निर्णय - अमरनाथ यात्रा न्यूज

सलग तिसऱ्या दिवशी अमरनाथ यात्रा बंद राहणार आहे. केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर २०१९ मध्ये केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द केली. तर गतवर्षी कोरोना महामारीमुळे अमरनाथ यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला होता.

Amarnath Yatra
अमरनाथा यात्रा

By

Published : Jun 21, 2021, 7:22 PM IST

श्रीनगर - कोरोना महामारीमुळे यंदा जम्मू आणि काश्मीरमध्ये होणारी यात्रा यंदाही पार पडू शकणार नाही. याबाबतची घोषणा जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल मनोज सिन्हा यांनी केली आहे. यात्रा बंद होणार असली तरी भाविक ऑनलाईन आरती करू शकणार आहेत.

अमरनाथ यात्रा होऊ शकणार नसल्याबाबतचे ट्विट जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की श्री अमरनाथजी यात्रा ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय श्री अमरनाथजी बोर्डच्या सदस्यांनी घेतला आहे. यात्रा ही प्रतिकात्मक स्वरुपात पार पडणार आहे. यात्रा बंद असले तरी सर्व धार्मिक पूजा ही नेहमीप्रमाणे पार पडणार आहे.

राज्यपालांचे ट्विट

हेही वाचा-Pawar Politics... शरद पवार- प्रशांत किशोर यांची दिल्लीत भेट, तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांसोबत उद्या दुपारी ४ वाजता बैठक

अनंतनाग जिल्ह्यात आहे अमरनाथ पवित्र गुहा

सलग तिसऱ्या दिवशी अमरनाथ यात्रा बंद राहणार आहे. केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर २०१९ मध्ये केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द केली. तर गतवर्षी कोरोना महामारीमुळे अमरनाथ यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला होता. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ पवित्र गुहेत ही यात्रा पार पडत असे. गतवर्षीप्रमाणे पुजेचे सकाळी आणि संध्याकाळी भाविकांसाठी प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

अमरनाथा यात्रा

हेही वाचा-नवं लसीकरण धोरण : कुणाला मिळणार मोफत लस; खासगी रुग्णालयात घेतल्यास किती लागणार पैसे?

२२ एप्रिलला बंद करण्यात आली यात्रेकरुची नोंदणी

५६ दिवस आणि ३,८८० किमीची अंतर असणारी अमरनाथ यात्रा २८ जूनला सुरू होणार होती. यात्रेकरिता १ एप्रिलला नोंदणी सुरू झाली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्याने २२ एप्रिलला अमरनाथ यात्रेकरिता नोंदणी बंद झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details