श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पवित्र अमरनाथ गुंफा परिसरात ढगफुटीमुळे १६ जणांचा मृत्यू झाला ( flash flood at amarnath cave ) आहे. अनेक यात्रेकरू बेपत्ता आहेत. लष्कराने शनिवारी सकाळी बचावकार्य सुरू केले आहे. ६ जणांना एअरलिफ्ट करण्यात आले. दुसरीकडे, माउंटन रेस्क्यू टीमने बेपत्ता लोकांचा शोध सुरू केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुरात किमान तीन लंगर आणि २५ प्रवासी तंबू वाहून गेले. सुमारे ४० यात्रेकरू बेपत्ता आहेत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढू शकतो.
बचाव कार्यासाठी कुत्र्यांची मदत :प्रशासनासोबतच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्याही मदतकार्यात गुंतल्या आहेत. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी एलजी मनोज सिन्हा यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आहे. हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. काही काळासाठी प्रवास थांबवण्यात आला आहे. हवामान खात्याचा अहवाल आणि इतर परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. निलागर हेलिपॅडवर वैद्यकीय पथके उपस्थित आहेत. माउंटन रेस्क्यू टीम आणि इतर टीम बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. परिस्थिती नियंत्रणात असून, अनेकांची सुटका करण्यात आल्याचा दावा बचावकार्यात सहभागी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केला आहे. बचावकार्य लवकरच पूर्ण होईल, असेही सुरक्षा दलांचे म्हणणे आहे. बचाव कार्यात शोध आणि बचाव कुत्रे देखील तैनात करण्यात आले आहेत. शरीफाबाद येथील दोन शोध आणि बचाव कुत्र्यांना हेलिकॉप्टरने पवित्र गुहेत नेण्यात आले आहे.
- NDRF हेल्पलाइन- 01123438252, 01123438253, 919711077372
- कमांड सेंटर हेल्पलाइन- 01942496240, 01942313149
- J&K SDRF- 911942455165, 919906967840
- अमरनाथ यात्रा हेल्पलाइन- ०१९१२४७८९९३