महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाब नव्या पक्षाची करणार स्थापना; 117 जागांवर उमेदवार उभे करणार - captain amarinder singh latest news

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज बुधवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपल्या नवीन पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. तसेच पंजाब विधानसभा निवडणुकीत 117 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Amarinder Singh To Form New Party
कॅप्टन अमरिंदर सिंग

By

Published : Oct 27, 2021, 12:03 PM IST

चंदीगढ - विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमधील राजकीय पेच अधिक वाढत चालला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज बुधवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपल्या नवीन पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. पक्षाचे नाव अद्याप ठरलेले नाही. मात्र, काँग्रेसपासून वेगळा पक्ष काढणार असल्याचे त्यांनी म्हटलं. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर काँग्रेस आणि त्यांच्या गटात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. आता अमरिंदर सिंग दिवाळीपूर्वी मोठा राजकीय धमाका करण्याच्या तयारीत आहेत.

शेतकरी मुद्यावर उद्या गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे अमरिंदर सिंग यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. मी अमित शाह यांची तीन वेळा भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अरुसा आलम यांच्यावर त्यांनी भाष्य केले. अरुसा आलम या गेल्या 16 वर्षांपासून भारतात येतात. पुन्हा व्हिजा सुरु झाला तर नक्कीच त्यांना बोलवेल, असेही सिंग म्हणाले.

नवज्योत सिद्धू जिथून निवडणूक लढवतील तिथे त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा केला जाईल. माझ्या पाठीशी अनेक नेते उभे आहेत. विधानसभा निवडणुकीत 117 जागांवर उमेदवार उभे करू, असे सिंग यांनी स्पष्ट केले.

52 वर्षांच्या राजकीय अनुभव -

माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नव्या राजकीय वाटचालीसाठी समर्थक नेत्यांसोबत विचारमंथन करत आहेत. कॅप्टन अमरिंदर यांच्या संपर्कात अनेक काँग्रेस नेते आणि आमदार असल्याचीही चर्चा आहे. अशा स्थितीत कॅप्टन यांच्या नव्या पक्षाच्या घोषणेने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. 79 वर्ष वय असलेल्या कॅप्टन यांना 52 वर्षांच्या राजकीय अनुभव आहे.

यापूर्वी अमरिंदर सिंग यांनी सोडला होता पक्ष -

कॅप्टन अमरिंदर यांनी 1980 मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. मात्र, 1984 मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टारनंतर त्यांनी काँग्रेस सोडून अकाली दलात प्रवेश केला होता. मात्र, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 1992 मध्ये अकाली दलापासून फारकत घेतली आणि शिरोमणी अकाली दल (पंथक) नावाचा पक्ष स्थापन केला. पण त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. 1998 च्या निवडणुकीत त्यांना पटियाला आणि तलवंडी साबो या दोन जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर कॅप्टन यांनी पुन्हा 1998 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा -गुप्त अधिकारी नौदलाच्या अधिकाऱ्याला सीबीआयकडून अटक; हेरगिरीचे आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details